मुंबई - शिवसेना पक्षावर हक्क कुणाचा यासंदर्भात शिवसेना ( Shiv Sena ) तसेच शिंदे गट यांच्या दाव्यावर सर्वोच्च न्यायालयामध्ये आज पक्षाकडून युक्तीवाद केला गेला. आजची सुनावणी थांबली असून, उद्या या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनवणी होणार आहे. या संदर्भात भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये ( BJP spokesperson Keshav Upadhyay ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. केशव उपाध्याय म्हणाले की, शेवटी लोकशाहीचा विजय ( Democracy will win ) होणार आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांच्या नेतृत्वाला आव्हान देत शिंदे गटाने शिवसेनेच्या सर्व याचिका रद्द करा ,अशी देखील मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात केली होती.
हेही वाचा - शिंदे गट विषारी झाड.. सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या प्रतिज्ञापत्रात शिवसेनेचा घणाघात
शेवटी लोकशाहीचाच विजय - शिवसेना कडून शिंदे गट कायदेशीर वैध आहे का? आमदारांची अपात्रता अशा अनेक विषयांवर सर्वोच्च न्यायालय उद्या निर्णय देईल. ह्या सुनावणीच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सांगितले की,"दोन्ही बाजूने वैचारिक युक्तिवाद होईल. एक प्रकारची वैचारिक घुसळण होईल. त्यातून शेवटी लोकशाहीचाच विजय होईल," असे त्यांनी ईटीव्ही भारतला सांगितले आहे.