ETV Bharat / city

दिल्ली SITची टीम मुंबईत दाखल; आर्यन खान ड्रग्ज प्रकरणासह 'या' सहा प्रकरणाचा करणार तपास

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचा तपास नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB)चे मुंबई झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्याकडून काढून घेतला आहे. 1996 च्या बॅचचे आईपीएस अधिकारी आणि उपमहासंचालक (DDG) संजय कुमार सिंह (SIT) यांच्याकडे आर्यन खानसह अन्य सहा प्रकरणांचा तपास हा देण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर दिल्ली SITची टीम आज (शनिवार) मुंबईत दाखल झाली.

Delhi SIT team to arrive in Mumbai; Aryan Khan will investigate six cases, including the drug case
दिल्ली SITची टीम मुंबईत दाखल; आर्यन खान ड्रग्ज प्रकरणासह 'या' सहा प्रकरणाचा करणार तपास
author img

By

Published : Nov 6, 2021, 12:02 PM IST

Updated : Nov 6, 2021, 4:05 PM IST

मुंबई - आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचा तपास नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB)चे मुंबई झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्याकडून काढून घेतला आहे. 1996 च्या बॅचचे आईपीएस अधिकारी आणि उपमहासंचालक (DDG) संजय कुमार सिंह (SIT) यांच्याकडे आर्यन खानसह अन्य सहा प्रकरणांचा तपास हा देण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर दिल्ली SITची टीम आज (शनिवार) मुंबईत दाखल झाली.

दिल्ली SITची टीम मुंबईत दाखल; आर्यन खान ड्रग्ज प्रकरणासह 'या' सहा प्रकरणाचा करणार तपास

साक्षीदारांचे पून्हा जबाब नोंदवण्याची शक्यता -

दिल्ली एसआयटी आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाच्या संदर्भातील सर्व कागदपत्रांची पाहणी करणार आहे. तसेच कागदपत्रांची पाहणी केल्यानंतर चौकशीला सुरुवात करणार होणार आहे. आर्यन खान प्रकरणातील पुन्हा सर्व साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात येण्याची शक्यता आहे.

NCBची SIT टीम मुंबईत होणार दाखल -

NCBची SIT टीम आर्यन खान ड्रग्ज प्रकरणासह अन्य 6 प्रकरणांचा तपास करणार आहे. NCBची टीम त्यासाठी आज मुंबईत पोहोचण्याची शक्यता आहे. स्वतः SIT आणि DDG संजय सिंह आपल्या टीम सोबत मुंबईत आले आहेत. एनसीबीचे अधिकारी हे एअर इंडियाच्या फ्लाइटने दिल्लीतून निघाले होते ते 1 वाजता मुंबईत पोहोचले.

या सहा प्रकरणांचा होऊ शकतो तपास -

NCBची एक टीम आर्यन खान याच्याशी जोडलेले क्रूज ड्रग्ज प्रकरणाचा तपास करणार आहे. मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान या प्रकरणाचा तपास हा SIT करणार आहे. नुकतेच ड्रग्ज प्रकरणात ताब्यात घेतलेल्या अरमान कोहली प्रकरणाचा तपासही SIT करणार आहे. या व्यतिरिक्त अन्य तीन प्रकरणांचा तपास समीर वानखेडे यांच्याकडून काढून घेऊन नवीन टीम करणार आहे.

हेही वाचा - आर्यन खान प्रकरणातून मला हटवले नाही - एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंची प्रतिक्रिया

हेही वाचा - वानखेडेंच्या चौकशीसाठी दोन एसआयटीची स्थापना; नवाब मलिक यांचे ट्विट

Last Updated : Nov 6, 2021, 4:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.