मुंबई - राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या ( Corona Patient ) आटोक्यात आहे. गेल्या काही दिवसात 1 हजाराहुन कमी रुग्ण आढळून येत आहेत. त्यात गेल्या काही दिवसात घट झाली आहे. आज (मंगळवारी) 699 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यातील ही सर्वात कमी रुग्णांची नोंद आहे. आज 19 रुग्णांचा मृत्यू ( 19 Patients Death )झाला आहे. तर 1087 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात ( Discharge to 1087 Patients ) आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.72 टक्के तर मृत्युदर 2.12 टक्के इतका आहे.
6,445 सक्रिय रुग्ण
आज राज्यात 699 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 66 लाख 39 हजार 995 वर पोहचला आहे. तर आज 19 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 1 लाख 41 हजार 194 वर पोहचला आहे. आज 1087 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 64 लाख 88 हजार 680 वर पोहचला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 97.72 टक्के तर मृत्यूदर 2.12 टक्के आहे. रुग्ण शोधून काढण्यासाठी आजपर्यंत 6 कोटी 62 लाख 55 हजार 554 चाचण्या करण्यात आल्या आहेत. एकूण करण्यात आलेल्या चाचण्यांपैकी 10.02 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 77 हजार 642 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून 6 हजार 445 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
'या' विभागात सर्वाधिक रुग्ण
मुंबई महापालिका - 189
ठाणे पालिका - 40
नवी मुंबई पालिका - 37
अहमदनगर - 46
पुणे - 46
पुणे पालिका - 76
पिंपरी चिंचवड पालिका - 49
'या' दिवशी कमी रुग्णांची नोंद
25 ऑक्टोबरला घट होऊन 889, 1 नोव्हेंबरला 809, 5 नोव्हेंबरला 802, 6 नोव्हेंबरला 661, 7 नोव्हेंबरला 892, 8 नोव्हेंबरला 751, 9 नोव्हेंबरला 982, 11 नोव्हेंबरला 997, 22 नोव्हेंबरला 656, 23 नोव्हेंबरला 766, 25 नोव्हेंबरला 848, 26 नोव्हेंबरला 852, 28 नोव्हेंबरला 832, 29 नोव्हेंबरला 536, 30 नोव्हेंबरला 678, 1 डिसेंबरला 767, 2 डिसेंबरला 796, 3 डिसेंबरला 664, 4 डिसेंबरला 782, 5 डिसेंबरला 707, 6 डिसेंबरला 518, 7 डिसेंबरला 699 असे सर्वात कमी नवे रुग्ण आढळून आले आहेत.