मुंबई - शहरातील रुग्ण दुपटीचा आणि रुग्ण बरे होण्याचा दर दिलासादायक आहे. मात्र, मुंबईतील ज्येष्ठ नागरिकांना असलेला कोरोनाचा धोका काही केल्या कमी होताना दिसत नाही. मुंबईतील 50 वर्षांवरील कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडा आता सहा हजारांच्या वर गेला आहे. एकूण मृत्यूच्या 83 टक्के मृत्यू हे 50 वर्षांवरील रुग्णांचे झाले आहेत. त्यामुळे आता मुंबई महानगरपालिकेने ज्येष्ठांच्या मृत्यूदरावर नियंत्रण आणण्यासाठी कडक निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे.
हेही वाचा - सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण : सुशांतचा स्वयंपाकी नीरजची सीबीआय चौकशी सुरू
7,265 पैकी 1,240 मृत्यू हे 0 ते 50 वयोगटातील असून याची टक्केवारी 17 टक्के आहे. पण, 50 ते 100 वयोगटातील मृत्यू चिंताजनक आहेत. त्यामुळे आता पालिकेने 50 वर्षांपुढील नागरिकांसाठीना होम क्वारंटाइनची परवानगी देण्याचा निर्णय रद्द केला आहे. आता लक्षणे असो वा नसो 50 वर्षांपुढील रुग्णांना रुग्णालयांमध्ये दाखल व्हावे लागणार आहे. तर इतरही उपाययोजना आता पालिकेकडून करण्यात येणार आहेत.
हेही वाचा - मुंबईला पाणीपुरवठा करणारे तानसा धरणही 'ओव्हरफ्लो', सातपैकी चार धरणे भरली