ETV Bharat / city

मुंबईत उपचारादरम्यान विद्यार्थिनीचा मृत्यू; डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा नातेवाईकांचा आरोप - वडिलांचा आरोप

जे. जे. वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असणाऱ्या भार्गवी नरेश दुपारे हिचा घाटकोपरच्या सपना खासगी रुग्णालयातील डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या पालकांनी केला आहे.

मृत भार्गवी नरेश दुपारे
author img

By

Published : Jun 15, 2019, 1:02 PM IST

मुंबई - पोटात दुखत असल्याने घाटकोपरच्या सपना या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या जे जे वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थिनीचा शुक्रवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. भार्गवी नरेश दुपारे असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप पालकांसह नातेवाईकांनी केला आहे.

घटनेबाबत माहिती देताना भार्गवीचे नातेवाईक

भार्गवी ही पॅरामेडिकलच्या दुसऱ्या वर्षात शिकत असून येत्या १८ तारखेला तिची परीक्षा होती. मात्र १३ जूनला रात्री २ वाजण्याच्या सुमारास तिच्या पोटात दुखू लागल्याने नातेवाईकांनी घाटकोपरच्या सपना हेल्थ केअरमध्ये उपचारासाठी दाखल केले. उपचार सुरू असताना आपण व्यवस्थित असल्याचे तिने आपल्या वडिलांना फोन वरून संवाद साधला होता. मात्र, अचानकपणे सकाळी ९ वाजता तिला कोणते तरी इंजेक्शन दिले त्यामुळे तिची तब्येत बिघडली. यानंतर तिला अस्वस्थ वाटू लागले आणि चेहरा सुजला. या सर्व प्रकारानंतर तिला आयसीयुत दाखल केले आणि तिच्यावर उपचार सुरू केले. मात्र, दुपारी पावणे एकच्या सुमारास तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी नातेवाईकांना कळवले. या मृत्यू प्रकरणी डॉक्टरांचा हलगर्जीपणा असून चुकीचे इंजेक्शन दिल्यानेच भार्गवीचा मृत्यू झाला, असा आरोप भार्गवीच्या वडिलांनी केला आहे.

भार्गवीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात पाठवला होता. मात्र, जोपर्यंत त्या डॉक्टरांवर कारवाई होत नाही. तोवर मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली होती. या मृत्यूबाबत सपना हेल्थ केअरशी संपर्क साधला असता डॉक्टर प्रतिक्रिया देण्यासाठी उपलब्ध होऊ शकले नाही. मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर आणि अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.

Intro:डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा वडिलांचा आरोप .

मुंबईतील जे जे वैद्यकीय महाविद्यालयात पेरामेडिकल चे दुसऱ्या वर्षात शिक्षण घेणारी विद्यार्थिनी भार्गवी नरेश दुपारे हीचा घाटकोपरच्या सपना या खाजगी रुग्णालयात तील डॉक्टरच्या हलगर्जीपणा मूळे आणि औषधोपचार चुकीचे केल्याने मृत्यू झाल्याचा आरोप भार्गवीच्या वडिलांनी केला आहेBody:डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा वडिलांचा आरोप .

मुंबईतील जे जे वैद्यकीय महाविद्यालयात पेरामेडिकल चे दुसऱ्या वर्षात शिक्षण घेणारी विद्यार्थिनी भार्गवी नरेश दुपारे हीचा घाटकोपरच्या सपना या खाजगी रुग्णालयात तील डॉक्टरच्या हलगर्जीपणा मूळे आणि औषधोपचार चुकीचे केल्याने मृत्यू झाल्याचा आरोप भार्गवीच्या वडिलांनी केला आहे ,

भार्गवी ही पेरामेडिकल च्या दुसऱ्या वर्षात शिकत असून येत्या 18 तारखेला तिची परीक्षा ही होती मात्र 13 तारखेच्या रात्री 2 वाजता तिच्या पोटात दुखू लागल्याने नातेवाईकांनी घाटकोपरच्या सपना हेल्थ केअर मध्ये उपचारासाठी दाखल केले , उपचार सुरू असताना आपण व्यवस्थित असल्याचे तिने आपल्या वडिलांना फोन वरून संवाद साधला होता.

अचानक पणे सकाळी 9 वाजता कोणते तरी इंजेक्शन दिले आणि भार्गवी ची तब्येत बिघडली , तिला अस्वस्थ वाटू लागले तिचा चेहरा सुजू लागला आणि म्हणून तिला आय सी यु त दाखल केले आणि तिच्यावर उपचार सुरू केले मात्र दुपारी 12.40 ला तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी नातेवाईकांना कळवले या मृत्यू प्रकरनी डॉक्टरांचा हलगर्जी पणा असून चुकीचे इंजेक्शन दिल्यानेच भार्गवीचा मृत्यू झाला असा आरोप भार्गवीच्या वडिलांनी केला आहे , भार्गवी चा मृतदेह श्वविच्छेदना करिता घटकोपरच्या राजावाडी रुग्णालया येथे आणला आहे. मात्र जोवर त्या डॉक्टरांवर कारवाई होत नाही. तोवर मृतदेह ताब्यात घेणार नाही. असे नातेवाईक म्हणाले. तर या मृत्यू बाबत आम्ही सपना हेल्थ केअर शी संपर्क केला असता डॉक्टर प्रतिक्रिया देण्यात साठी उपलब्ध होऊ शकले नाही तर मृतदेहाचे शव विच्छेदन झाल्या नंतर आणि अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ठ होणार आहे .
Byte - नरेंद्र दुपारे - मुलीचे वडील
Byte - प्रमोद दुपारे - मुलीचे चुलतेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.