ETV Bharat / city

Devendra Fadnavis : 'सरपंच, नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडल्याने...'; देवेंद्र फडणवीसांचा काँग्रेस-राष्ट्रवादीवर हल्लाबोल - देवेंद्र फडणवीसांची काँग्रेस राष्ट्रवादीवर टीका

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरपंच आणि नगराध्यक्ष थेट जनतेतून आणण्याचा घेतलेल्या निर्णयावरुन टीका केली होती. त्याला सरपंच आणि नगराध्यक्ष यांची थेट जनतेतून निवड ( Direct Elections Sarpanch And Mayor ) होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला पैशाची खेळी करता येत नाही, असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी केला ( DCM Devendra Fadnavis Criticized Congress Ncp ) आहे.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis
author img

By

Published : Jul 16, 2022, 3:47 PM IST

मुंबई - सरपंच आणि नगराध्यक्ष थेट जनतेतून आणण्याचा घेतलेल्या निर्णयावरुन विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-भाजप सरकारवर टीका केली होती. त्यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 2014 साली राज्यातील भाजप सरकारने सरपंच आणि नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय घेतला. त्याचा फायदा संपूर्ण राज्यभर पहायला मिळाला. देशात अन्य राज्यातही थेट जनतेतून सरपंच आणि नगराध्यक्ष निवडले जातात. मात्र, सरपंच आणि नगराध्यक्ष यांची थेट जनतेतून निवड ( Direct Elections Sarpanch And Mayor ) होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला पैशाची खेळी करता येत नाही, असा आरोप उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केला ( DCM Devendra Fadnavis Criticized Congress Ncp ) आहे.

'महापौर जनतेतून निवडून आणण्याच विचार नाही' - राज्य मंत्रिंडळाच्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. फडणवीस म्हणाले की, राज्यात भाजपचे सरकार असताना थेट जनतेतून निवडून येण्याचा निर्णय घेतला. मात्र, 2019 ला सत्ता पालट झाल्यानंतर तात्कालीन सरकारने हा निर्णय फिरवला. त्यामुळेच सरपंच आणि नगराध्यक्ष जनतेतून निवडून आणण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. काही राज्यात महापौर देखील जनतेतून निवडले जातात. पण, सध्या महाराष्ट्र सरकारचा महापौर जनतेतून निवडून आणण्याचा कोणताही विचार नाही, असे स्पष्टीकरणही फडणवीस यांनी दिले.

'विरोधकांची लाईन डेड, म्हणूनच त्यांना डेडलाईन हवी' - राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी होऊन 14 दिवस उलटले तरी, अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. यावर सातत्याने विरोधकांकडून केली जाणाऱ्या टीकेला उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी चिमटा काढला. "विरोधकांची लाईन डेड, म्हणूनच त्यांना डेडलाईन हवी", असा टोला राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणीस यांनी विरोधकांना लगावला आहे. तर, तिथेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल. मात्र, सध्या मंत्रिमंडळ विस्तार झाला नसला, तरी राज्यांचे कोणतेही काम थांबलेलं नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलं.

'गुजरात दंगल प्रकरणात महाराष्ट्र सरकार मदत करणार' - गुजरातमध्ये झालेल्या दंगल प्रकरणात कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांनी भाजपच्या विरोधात कट रचल्याचा आरोप गुजरात एटीएसने केला आहे. यासाठी काही रक्कमही त्यांना देण्यात आली असल्याचं एटीएसचं म्हणणं आहे. या प्रकरणात तिस्ता सेटलवाड या महाराष्ट्राल्या असल्याने याबाबत गुजरात एटीएसला जी काही मदत लागेल ती महाराष्ट्र सरकारकडून देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

'राऊत यांना रोज एकच काम' - संजय राऊत सातत्याने एकनाथ शिंदे सरकारवर टीका करत आहेत. केवळ दोनच मंत्र्यांचं हे सरकार असल्याची टीका संजय राऊत यांच्याकडून केली जातेय. यावर बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, संजय राऊत यांना सकाळी उठून रोज प्रसार माध्यमांसमोर जाऊन बोलण्याशिवाय काही काम नाही. त्यांना हे एकच काम असतं. मात्र, आम्ही मिळून रोज जनतेच्या हिताची निर्णय घेत आहोत. कोणतंही जनतेचे काम आम्ही अडून दिलेलं नाही. राज्यामध्ये पूर परिस्थिती असताना, त्या ठिकाणचे दौरे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून आम्ही करत आहोत. त्यामुळे संजय राऊत यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, असा टोला मुख्यमंत्र्यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.

हेही वाचा - State Cabinet Meeting : औरंगाबाद आणि उस्मानाबादचे पुन्हा नामांतर, नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.