ETV Bharat / city

राज्यातील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न गंभीर; 'या' जिल्ह्यांत इतक्या इमारती धोकादायक

author img

By

Published : Jun 11, 2021, 6:51 PM IST

नुकतेच मालाडच्या मालवणी भागातील एका इमारतीचा तळमजला सोडून तिचे तीन मजली शेजारील घरावर कोसळे होते. यात ११ जणांचा मृत्यू झाला होता व ७ जण जखमी झाले होते. या घटनेनंतर मुंबईच नव्हे तर राज्यातील अनधिकृत बांधकाम आणि धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Unauthorized construction nagpur review
अनधिकृत बांधकाम महाराष्ट्र राज्य

मुंबई - नुकतेच मालाडच्या मालवणी भागातील एका इमारतीचा तळमजला सोडून तिचे तीन मजली शेजारील घरावर कोसळे होते. यात ११ जणांचा मृत्यू झाला होता व ७ जण जखमी झाले होते. या घटनेनंतर मुंबईच नव्हे तर राज्यातील अनधिकृत बांधकाम आणि धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील काही जिल्ह्यांमधील अनधिकृत बांधकामाचा आढावा ईटीव्ही भारतने घेतला.

हेही वाचा - मुंबईला कोरोनाकाळात अनधिकृत बांधकामाचा विळखा; माहिती अधिकारात आले पुढे

मुंबईत ४८५ धोकादायक इमारतींची नोंद

मुंबई - जागतिक दर्जाचे व देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात दरवर्षी पावसाळ्यात अतिधोकादायक इमारतींची समस्या निर्माण होते. मुंबईत २०१९ मध्ये ४९९, २०२० मध्ये ४४३, तर २०२१ मध्ये ४८५ अतिधोकादायक इमारती असल्याची नोंद झाली आहे. मुंबई महापालिकेकडून धोकादायक इमारतींना नोटीसा दिल्या तरी त्यानंतर पुढील कार्यवाही संथ गतीने होत असल्याने धोकादायक इमारतींची संख्या कमी होत नाही. यामुळे अशा अतिधोकादायक इमारतींमध्ये अद्यापही हजारो मुंबईकर आपला जीव मुठीत घेऊन राहत आहेत.

धोकादायक इमारतींची आकडेवारी

एकूण धोकादायक इमारती - ४८५
इमारती पाडल्या - १४८
इमारती खाली केल्या - १०७
कार्यवाही सुरू - २३०
कोर्टात स्टे - ७३
वीज पाणी कापले - ११२
पाणी वीज सुरू - २५

धोकादायक इमारती वर्ष इमारतींची संख्या

२०२१ - ४८५
२०२० - ४४३
२०१९ - ४९९

नागपुरात धोकादायक इमराती दीडशे पार, महापालिकेने बजावली नोटीस

नागपूर - नागपूर महापालिका क्षेत्रात येणाऱ्या गांधीबाग, नेहरूनगर सारख्या जुन्या वस्त्यांमध्ये असलेल्या अनेक इमारती धोकादायक असल्याचे एका सर्वेक्षणातून पुढे आले आहे. यामध्ये 170 पेक्षा जास्त इमारतींचा धोकादायक यादीत समावेश असून, 97 इमारती या गांधीबाग परिसरात आहे. 50 च्या घरात नेहरूनगर परिसरात आहे. या इमारती राहण्यास योग्य नसल्या तरी आजही लोक जीव धोक्यात घालून वास्तव्यास करत आहेत.

'या' इमारतीत दोनशे कुटुंब राहतात

नागपूर शहरातील मॉडर्न मिल चाळ ही सर्वात जुनी चाळ असून जीर्ण झाली आहे. यात मजुरांची तिसरी पिढी राहत आहे. मॉडेल मिलच्या जागेवर आज टोलेजंग फ्लॅट सिस्टीम उभी राहिली असली तरी याच इमराती समोर असणारी ही चाळ शेवटच्या घटका मोजत आहे. जुन्या पद्धतीने बांधणी असलेली ही इमारत पाहून कोणी राहत असेल यावर विश्वास बसणार नाही. पण, दुसरा पर्याय नसल्याने याच ठिकाणी सुमारे २०० कुटुंबे वास्तव्यास आहेत.

यातील अनेक इमरातीची प्रकरणे काही वादामुळे न्यायलयात आहे. यातील काही इमारती धारकांना महापालिकेने पावसाळ्याच्या तोंडावर नोटीस बजावली आहे. नागपूर महापालिकेकडून याबाबत एक सर्वेक्षण करण्यात आले, यावेळी तब्बल 60 वर्षे जुन्या व 30 वर्षे जुन्या अशा 20 हजारांच्या घरात इमारती असल्याचे सांगण्यात आले.

पावसाळ्याच्या तोंडावर पुणे शहरातील 159 धोकादायक इमारतींवर कारवाई

पुणे - पावसाळ्याच्या तोंडावर शहरातील जीर्ण जुन्या इमारती व वाडे यांचा बिकट प्रश्न समोर आल आहे. मुंबईमध्ये इमारत पडण्याच्या घटनेनंतर या प्रश्नाचे गांभीर्य अधिकच वाढले आहे. पुण्याचा विचार केला तर पेठांमध्ये असलेले जुने वाडे अधिक धोकादायक आहेत.

महापालिकेने पुणे शहरात असलेल्या जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींवर कारवाई सुरू केली आहे. अशा इमारतीममधील रहिवाशांना महापालिकेने नोटीस पाठविल्या आहेत. पावसाळ्याच्या आधी महापालिकेने ही कारवाई सुरू केली. महापालिकेने अशा 159 इमारतींना नोटीस पाठविली आहे.

4 इमारती पाडल्या

शहरात पूर्णपणे मोडकळीस आलेले 4 वाडे पाडण्यात आले आहेत. तर, इतर धोकादायक इमारती खाली करून त्यांची डागडुजी करण्याच्या सूचना महापालिकेने दिल्या आहेत. राज्य सरकारच्या नियमाप्रमाणे धोकादायक इमारती या तीन गटांमध्ये विभागण्यात येतात. यात अतिधोकादायक, राहण्यास अयोग्य व तात्काळ त्या इमारती पाडणे या पहिल्या वर्गवारीत यावर्षी शहरात 4 इमारती होत्या.

दुरुस्तीच्या सूचना -

दुसऱ्या वर्गवारीत इमारत रिकामी करून ती दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या जातात. पुण्यातल्या शनिवार पेठ, नारायण पेठ, कसबा पेठ, रास्ता पेठ, बुधवार पेठ यासारख्या पेठांमधील 155 अशा इमारतींवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच, यातील 29 इमारतींचा धोकादायक भाग पाडण्यात आला आहे. तर, 56 मिळकती या तात्काळ दुरुस्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

भंडारा शहरात 21 इमारती धोकादायक, नगरपरिषदेने घरमालकांना बजावली नोटीस

भंडारा - शहरात तब्बल 21 इमारती धोकादायक स्थितीत असल्याचे भंडारा नगर परिषदेने केलेल्या सर्वेक्षात उघड झाले आहे. शहरात अजून 10 इमारतींचे सर्वे सुरू आहेत. यापैकी काही इमारती या धोकादायक ठरणार असल्याने, ही संख्या वाढणार आहे. भंडारा नगरपरिषदेने या सर्व 21 इमारतींच्या मालकांना नोटीस बजावली आहे.

'इमारती पडण्याचे काम प्रथम'

भंडारा नगर परिषदेच्या हद्दीतील 21 इमारती धोकादायक परिस्थिति असल्याचे सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. यामध्ये काही कवेलूचे, तर काही स्लॅबची घरे आहे. 50 वर्षांहून अधिक काळ झालेल्या इमारतींचा यामध्ये समावेश आहे. या सर्व 21 इमारतींच्या घरमालकांना नोटीस बजावल्या आहेत. यापैकी काही इमारती, चक्क बाजारपेठेतील मुख्य रस्त्यांवर आहे. 21 पैकी ज्या इमारती जास्त मोडकळीस आलेल्या आहेत, अशा इमारतींना शक्य तेवढ्या लवकर पाडण्यासाठी आम्ही घरमालकांना सांगितले आहे. जर घरमालकांनी त्या इमारती पाडल्या नाही, तर नगर परिषद या इमारती लवकरात-लवकर पाडेल, असे मुख्याधिकारी विनोद जाधव यांनी सांगितले आहे.

कामगार व उद्योग नगरीतील शेकडो धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर

ठाणे - कामगारांचे शहर म्हणून ओळख असलेल्या भिवंडी महापालिका हद्दीत अतिधोकादायक इमारतींची संख्या ५८९ असून धोकादायक इमारतींची संख्या ४०० एवढी आहे. अशा प्रकारे शहरात सुमारे ९८९ इमारती धोकादायक असून या सर्व इमारतींना महापालिकेकडून पावसाळ्यापूर्वी नोटीस बजावण्यात आल्या आहेत, अशी माहिती मनपाचे उपायुक्त दिपक झिंजाड यांनी दिली. दुसरीकडे या धोकादायक इमारतींना नोटीस देऊन देखील काही नागरिक आपल्या परिवाराचे स्थलांतर करीत नसल्याने पावसाळ्यात या धोकादायक इमारती कोसळण्याच्या अनेक घटना घडत असून त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. भिवंडी शहरातील धोकादायक इमारतींमध्ये सुमारे २५ हजार कुटुंबे राहत असून सुमारे एक लाख नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.

उल्हासनगरमध्ये एकूण १४७ इमारती धोकादायक

उल्हासनगरमध्ये एकूण १४७ इमारती धोकादायक असल्याचे पालिका प्रशासनाने जाहीर केले असून त्यापैकी २३ इमारती अतिधोकादायक आहेत. २३ पैकी १८ अतिधोकादायक इमारती रिकाम्या असून, अन्य इमारतींमधील नागरिकांना इतरत्र हलविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. धोकादायक इमारतींच्या यादीव्यतिरिक्त इतर इमारतींचे स्लॅब कोसळून नागरिकांचे बळी जात असल्याने, धोकादायक इमारतींच्या यादीवरही प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. अखेर महापालिकेने १० वर्षे जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेऊन इमारतींना नोटीस दिल्या आहेत. तर, सरकारने खास शहरासाठी काढलेल्या अध्यादेशांतर्गत धोकादायक इमारतींची पुर्नबांधणी होऊ शकते का? याबाबतचा प्रश्न जैसे थे असल्याची चर्चा नागरिक करताना दिसत आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत ६०० इमारती धोकादायक

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत जवळपास ६०० इमारती धोकादायक आणि अतिधोकादायक असून पावसाळ्यात या इमारतींची पडझड होत मनुष्य आणि वित्तहानी होण्याची भीती आहे. मात्र, इमारती अतिधोकादायक होत काही प्रमाणात या इमारतींची पडझड झाल्यानंतरही रहिवासी जीव मुठीत घेऊन याच ठिकाणी राहतात. अनेक वर्षांपासून राहत असलेल्या इमारतीत आपल्याला हक्काचे घर मिळावे, अशी रहिवाशांची अपेक्षा असते. मात्र जागा मालकांसह संबंधित बिल्डरला इमारती रहिवाशांना रस्त्यावर आणून रिकाम्या करून हव्या असतात. यातून वाद निर्माण होतात आणि रहिवासी घरे सोडण्यास तयार होत नाहीत. त्यातच कल्याण डोंबिवली हद्दीत धोकादायक आणि अति धोकादायक इमारतींमधील ७० टक्के इमारती अशा प्रकारे वादग्रस्त आहेत. मात्र, आता अशा वादग्रस्त इमारतींची पडझड होत कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याला सदर बिल्डरला जबाबदार धरले जाणार असल्याचे पालिका आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. यामुळे आतातरी अतिधोकादायक इमारतीचा प्रश्न मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे.

हेही वाचा - कोरोनामध्ये होणाऱ्या 'सायटोकाइन स्टॉर्म'मुळे होऊ शकतो मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.