मुंबई - रमजानचा पवित्र महिना शनिवारी सुरू झाला आहे, या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी शनिवारी दादरमध्ये फ्लॅग मार्च काढला होता. दादर भागात पोलिसांचा फ्लॅग मार्च येताच जनतेने टाळ्यांनी पोलिसांचे स्वागत केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवण्याची घोषणा केली. मात्र, अनेक बेशिस्त नागरिक लॉकडाऊनचे नियम मोडून बाहेर पडत असल्याचे चित्र आहे. यामुळे मुंबई पोलिसांनी नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन फ्लॅग मार्चद्वारे केले आहे.
दरम्यान, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या डॉक्टरांसह पोलीस तसेच सफाई कर्मचार्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. काही दिवसापूर्वी मुंबईतील एका पोलीस कर्मचाऱ्यालाही कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, त्यांच्या तब्येतीने साथ न दिल्यामुळे त्यांचा शनिवारी मृत्यू झाला.