मुंबई : एनआयए, मुंबई गुन्हे शाखेच्या तपासात अंडरवर्ल्डच्या गैरकारभाराबाबत मोठा खुलासा झाला आहे. अलीकडेच मुंबईला मिळणाऱ्या घातपाताच्या धमक्यांचा पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस आणि केंद्रीय तपास यंत्रणा सतर्क झाल्यात. त्यांनी याचा तपास करण्यासाठी कंबर कसली आहे. त्यात डी गॅंगने आपलं जाळं कसं पसरू पाहत आहे. याबाबत तपास यंत्रणांनी खुलासा केला आहे.
आयएमईआय नंबरशी छेडछाड - नुकत्याच झालेल्या इंटेलिजन्स शेअरिंग बैठकीत देशातील विविध गुप्तचर संस्था हजर होत्या. डी-कंपनीचे म्हणजेच अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचे नेटवर्क नेस्तनाबूत करण्यासाठी मुंबई गुन्हे शाखा तसेच एनआयए कंबर कसत आहे. अंडरवर्ल्डच्या तपासादरम्यान काही गोष्टी आढळून आल्यात. D Company network by stolen mobile त्यामध्ये देशभरातील चोरीला गेलेल्या स्मार्टफोनमध्ये मुंबईतील डी कंपनीच्या टेक्नो तज्ज्ञांकडून आयएमईआय नंबरशी छेडछाड केली जात आहे. या तपासात आश्चर्यकारक बाब उघडकीस आली ती म्हणजे याच चोरीच्या मोबाईलचा आयएमईआय क्रमांक वापरून एकाच वेळी 40 ते 50 मोबाईल चालवले जात आहेत.
बांगलादेश पाकिस्तान कनेक्शन - हे चोरीचे फोन प्रथम बांगलादेशला पाठवले जातात. जिथे IMEI नंबर बदलला जातो आणि हे चोरीचे फोन बांगलादेशातून पाकिस्तानात पोहोचत असल्याचा संशय एजन्सींनी व्यक्त केला आहे. नंतर डी कंपनी एकतर त्यांचा वापर करते किंवा काळ्या बाजारात ते विकले जातात. आरोपींनी आयएमईआय क्रमांक बदलण्यासाठी वापरलेले लॅपटॉप आणि तंत्रज्ञान शोधले जात असल्याचेही गुन्हे शाखेने बैठकीत सांगितले.