मुंबई - भरधाव वेगामुळे सायरस मिस्त्री ( Cyrus Mistry Accident ) यांना 11 वेळा भरावा दंड भरावा लागला होता. ही माहिती समोर येत आहे. सायरस मिस्त्री एमएच 47 एबी 6705 या कारमधून प्रवास करायचे. दरम्यान 24 मे 2019 ते 15 एप्रिल 2022 अतिवेगाने एकूण १३ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता.
दोघांचा मृत्यू दोन जखमी सायरस मिस्त्री यांचा रविवारी दुपारी मुंबई अहमदाबाद महामार्गावर झालेल्या अपघातात मृत्यू झाला. गुजरातमधील उडवाडा येथे बांधलेल्या पारशी मंदिरातून ते परतत होते. महाराष्ट्रातील पालघरजवळ 54 वर्षीय मिस्त्री यांची मर्सिडीज रस्ता दुभाजकावर आदळली. या अपघातात मिस्त्री आणि त्यांचे मित्र जहांगीर पांडोळे हे दोघे जागीच ठार झाले, तर कार चालवत असलेल्या महिला डॉक्टर अनायता पांडोळे आणि त्यांचे पती दारियस पांडोळे हे जखमी झाले.
सुमारे 134 किमी प्रतितासाचा वेग सायरस मिस्त्री येत असलेली लक्झरी मर्सिडीज कार सुमारे 134 किलो मीटर प्रतितास वेगाने चालत होती हे समोर आले आहे. अपघातापुर्वी काही मिनिट आगोदरचे कारचे शेवटचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले त्यावरुन रविवारी दुपारी २ वाजुन २१ मिनीटाला या कारने चारौती चेकपोस्ट ओलांडले. अपघाताचे ठिकाण येथून 20 किमी अंतरावर आहे. मर्सिडीज कारने हे अंतर अवघ्या 9 मिनिटांत पूर्ण केल्याचे समोर आल्यामुळे कारचा वेग जास्त होता हे समोर आले.
सीट बेल्ट घालने टाळले ओव्हरटेकिंगच्या वेळी भरधाव वेग आणि निर्णय चुकल्यामुळे कार रस्त्याच्या दुभाजकाला धडकली, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. अपघातात जीव गमावलेले मिस्त्री आणि जहांगीर हे दोघेही मागे बसले होते त्यांनी सीट बेल्ट घातलेला नव्हता. त्याचवेळी डिव्हायडरला कार धडकल्यानंतर पुढील एअरबॅग्ज उघडल्या, मात्र मागील एअरबॅग सिटबेल्ट घातलेला नसल्यामुळे उघडल्या गेल्या नाहीत. हे एक त्यांच्या मृत्यू मागचे एक कारण सांगीतले जात आहे.
पॉलीट्रॉमामुळे झाला मृत्यू या अपघातात सायरस मिस्त्री यांच्या डोक्याला तसेच शरीराच्या अंतर्गत भागात गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला ही बाब पोस्टमॉर्टम अहवालात समोर आली आहे. वैद्यकीय भाषेत याला पॉलीट्रॉमा म्हणतात. त्यामुळे सायरस मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला. सायरस आणि जहांगीरचे पोस्टमॉर्टम रविवारी रात्री मुंबईतील जेजे रुग्णालयात झाले. त्या नंतर डाॅक्टरांनी त्यांच्या मृत्यू मागचे कारण स्पष्ट केले