ETV Bharat / city

Cyrus Mistri Accidental Death : डोक्याला जबर मार लागल्याने सायरस मिस्त्री यांचा अपघात स्थळीच मृत्यू, डॉक्टरांची माहिती - सायरस मिस्त्री यांचा जागीच मृत्यू

कासा रुग्णालयाचे डॉक्टर शुभम सिंह Doctor Shubham Singh of Casa Hospital यांनी सांगितले की, जेव्हा सायरस यांना येथे आणण्यात आले तेव्हा त्याच्या डोक्याला दुखापत झाली होती. शरीरातून अंतर्गत रक्तस्त्रावही होत होता. या रक्तस्रावामुळे रुग्णालयात येण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू Cyrus Mistri Accidental Death झाला होता.

Cyrus Mistri Accidental Death
सायरस यांचा अपघात स्थळीच मृत्यू
author img

By

Published : Sep 5, 2022, 9:11 AM IST

Updated : Sep 5, 2022, 9:51 AM IST

मुंबई - उद्योजक सायरस मिस्त्री Entrepreneur Cyrus Mistry (५४ वर्षे) यांचे रविवारी महाराष्ट्रातील पालघरजवळ झालेल्या अपघातात निधन Cyrus Mistri Accidental Death झाले. अपघातानंतर लगेचच सायरस यांना प्रथम कासा येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. येथे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर मृत घोषित करण्यात आले. डॉक्टरांनी सांगितले की जेव्हा सायरस यांना येथे आणण्यात आले तेव्हा त्याच्या डोक्याला दुखापत झाली होती. शरीरातून अंतर्गत रक्तस्त्रावही होत होता. या रक्तस्रावामुळे रुग्णालयात येण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

अपघातात जागीच मृत्यू - माध्यमांशी बोलताना कासा रुग्णालयाचे डॉक्टर शुभम सिंह Doctor Shubham Singh of Casa Hospital यांनी सांगितले की, प्रथम दोन रुग्णांना रुग्णालयात आणण्यात आले, त्यापैकी एक सायरस मिस्त्री आणि दुसरे जहांगीर दिनशा पंडोल होते. दोघांनाही जेव्हा रुग्णालयात आणण्यात आले तेव्हा इथं येण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांना घेऊन आलेले स्थानिक सायरस मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगितात. जहांगीर दिनशा पंडोल हे गंभीर जखमी झाले होते पण, त्यांचा अपघात स्थळाहुन रुग्णालयात आणताना मृत्यू झाला. सायंकाळी पाचच्या सुमारास आम्ही त्यांना मृत घोषित केले." असं डॉक्टर सिंह यांनी सांगितलं आहे.

एक्सपर्ट ओपिनियनसाठी मृतदेह जेजे रुग्णालयात - डॉक्टर सिंह पुढे सांगतात की, "शवविच्छेदन सरकारी रुग्णालयात होणार होते, तथापि, जिल्हाधिकाऱ्यांचा फोन आला आणि त्यांना 'तज्ञांच्या मतासाठी' जेजे रुग्णालयात हलवावे लागेल असे सांगितले. त्यानंतर मृतदेह मुंबईला पाठवण्यात आला. सायरस मिस्त्री यांच्या डोक्याला दुखापत झाली होती आणि जहांगीर दिनशा यांचा डावा पाय फ्रॅक्चर झाला होता आणि डोक्याला दुखापत झाली होती. त्याचे पोस्टमॉर्टम येथे होणार होते, परंतु आम्हाला जिल्हाधिकारी आणि एसपींचा फोन आला की तज्ज्ञांच्या मतासाठी मृतदेह जेजे रुग्णालयात हलवावा लागेल." अशी प्रतिक्रिया डॉक्टर शुभम सिंह यांनी दिली आहे.

दरम्यान, उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा काल अपघातात मृत्यू झाला आहे. ते टाटा ग्रुपचे माजी चेअरमन Tata Group Cyrus Mistry death होते. त्यांच्या अपघातामुळे उद्योगविश्वाला मोठा धक्का बसला आहे. मृतात जहांगीर दिनशा पंडोल, सायरस मिस्त्री यांचा समावेश आहे. जखमीमध्ये अनायता पंडोले (महिला), दरीयस पांडोले यांचा समावेश आहे. टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांची कार मुंबईच्या Cyrus Mistry death in accident शेजारील महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात दुभाजकाला धडकल्याने अपघात झाला आहे. रविवारी झालेल्या अपघातात मिस्त्री ठार झाल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. मिस्त्री हे मर्सिडीज कारमधून अहमदाबादहून मुंबईला जात होते, असे त्यांनी सांगितले. मिस्त्री अहमदाबादहून मुंबईला जात असताना दुपारी ३.१५ च्या सुमारास हा अपघात झाला. सूर्या नदीवरील पुलावर हा अपघात झाला. हा अपघात वाटतो, पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. सर्व जखमींना गुजरातमधील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्यांच्याकडून अधिक माहिती घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले. मुंबई अहमादाबाद महामार्गावरील सुर्या नदीच्या पुलावर अपघात झाला. सायरस मिस्त्री यांच्यासह दोन लोक दगावल्याची माहिती समोर आली आहे.

एकनाथ शिंदे यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांच्या निधनाचे वृत्त ऐकून धक्का बसला.सायरस मिस्त्री हे केवळ एक यशस्वी उद्योजक नव्हते तर उद्योग विश्वातील एक तरुण, उमदे आणि भविष्यवेधी व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. एक कर्तबगार उद्योजक आपल्यातून गेला आहे. ही केवळ मिस्त्री कुटुंबियांची नव्हे तर देशातील उद्योग विश्वाची मोठी हानी आहे. माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

टाटा सन्स आणि सायरस मिस्त्री यांच्यात वाद टाटा सन्स आणि सायरस मिस्त्री यांच्यात वाद झाला होता. त्यामुळे ते चर्चेत आले होते. त्यानंतर हे प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयात गेले होते. सायरस मिस्त्री यांची टाटा ग्रुपचे सहावे चेअरमन म्हणून २०१२ मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, त्यांना २४ ऑक्टोबर २०१६ मध्ये टाटा संचालक मंडळाने पदावरून काढले होते. हे कृत्यदेखील बेकायदेशीर असल्याचे कायदे लवाद प्राधिकरणाने म्हटले आहे.

इन्व्हेस्टमेंट्स आणि स्टर्लिंग इन्व्हेस्टमेंट्स कॉर्प या दोन कंपन्या सायरस यांच्या मालकीच्या आहेत. त्यांनी मुंबईमध्ये कार्यालय असलेल्या एनसीएलएटीमध्ये टाटा सन्सविरोधात याचिका दाखल केली होती. तसेच दडपशाही आणि गैरव्यवस्थापन होत असल्याचा आरोप याचिकेत केला होता. यापूर्वी प्राधिकरणाने सायरस यांची याचिका रद्द केली होती. टाटा कन्सलन्टन्स सर्व्हिसचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी २० फेब्रुवारी २०१७ ला टाटा सन्सच्या चेअरमनपदाची जबाबदारी स्वीकारली आहे.

हेही - PM Narendra Modi Meet Teachers : आज शिक्षक दिन; पंतप्रधान मोदी राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शिक्षकांसोबत साधणार संवाद

Last Updated : Sep 5, 2022, 9:51 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.