ETV Bharat / city

दैव बलवत्तर होते म्हणून.. 'तौक्ते' वादळातून सुखरुप बचावलेल्या जहाजातील तरुणांची आपबिती

अरबी समुद्रात आलेल्या तौक्ते वादळामुळे समुद्र खवळला होता. उंचच उंच लाटा उसळत होत्या. समुद्रसपाटीपासून ७० किलोमीटर अंतरावर जहाजात अडकून पडलो. सुरक्षेसाठी लावलेले जहाजांचे नांगरही तुटल्याने ते हेलकावे खात बुडू लागले. त्यामुळे क्षणाचाही विलंब न करता जीव वाचविण्यासाठी उसाळलेल्या समुद्रात थेट उड्या मारल्या. अखेर २४ तासानंतर भारतीय नौसेना, कोस्ट गार्डच्या मदतीने आम्हाला बाहेर काढण्यात आले. अशी प्रतिक्रिया या वादळातून सुखरुप बचावलेल्या तरुणांनी दिल्या.

Cyclone Tauktae Disaster Safe release of a young man

author img

By

Published : May 18, 2021, 10:10 PM IST

Updated : May 18, 2021, 10:17 PM IST

मुंबई - अरबी समुद्रात आलेल्या तौक्ते वादळामुळे समुद्र खवळला होता. उंचच उंच लाटा उसळत होत्या. समुद्रसपाटीपासून ७० किलोमीटर अंतरावर जहाजात अडकून पडलो. सुरक्षेसाठी लावलेले जहाजांचे नांगरही तुटल्याने ते हेलकावे खात बुडू लागले. त्यामुळे क्षणाचाही विलंब न करता जीव वाचविण्यासाठी उसाळलेल्या समुद्रात थेट उड्या मारल्या. अखेर २४ तासानंतर भारतीय नौसेना, कोस्ट गार्डच्या मदतीने आम्हाला बाहेर काढण्यात आले. दैव बलवत्तर होते म्हणूनच वाचलो, अशी प्रतिक्रिया समुद्रातून सुखरुप बाहेर आलेल्यांनी दिली.

एक रात्र अन् एक दिवस समुद्राच्या पोटात -

तौक्ते चक्रीवादळाने कोकण किनारपट्टींना जोरदार तडाखा देत, गुजरातच्या दिशेने पुढे सरकला. हवामान खात्याने चक्रीवादळाचा तीन ते चार दिवसांपूर्वी इशारा दिला होता. मच्छिमार बांधवांनी नौका किनारपट्टीवर उभ्या केल्या होत्या. मात्र, सोसाट्याच्या वाऱ्याने मोठे नुकसान केले. मोठ्या प्रमाणात पडझडीच्या घटना देखील घडल्या. हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर अनेक जहाज समुद्रात उभे करण्यात आले होते. यातील हिरा ऑईल फिल्डमधील ‘बार्ज पी - 305’ वरच्या जवळपास दिडशे कर्मचाऱ्यांचा समावेश होता. यातील काही जणांनी जीव वाचविण्यासाठी पाण्यात उड्या मारल्या. एक रात्र एक दिवस समुद्राच्या पोटात होतो. भारतील नौसेना आणि कोस्ट गार्डच्या पथकांने त्यानंतर सुखरुप बाहेर काढले.

दैव बलवत्तर होते म्हणून..
पूर्ण रात्रभर पाण्याशी संघर्ष -
आमचे जहाज खूप मोठे होते. चक्रीवादळात ते टिकेल, असे वाटले होते. समुद्रात उंच लाटा उसळत होत्या. जहाजाचे एक एक करुन नांगर यावेळी तुटायला लागले. त्यानंतर ते हेलकावे खाऊन ते बुडू लागले. समुद्राचे उधाण पाहून मनात धडकी भरली होती. पण जीव वाचवणे महत्वाचे होते. त्यामुळे लाईफ जॅकेटसह आम्ही समुद्रात उड्या घेतल्या. दुपारी चार वाजले असावेत. पूर्ण रात्रभर त्यानंतर पाण्याशी संघर्ष केला. अखेर भारतीय नौसेना आणि कोस्ट गार्डने आम्हाला आज बाहेर काढले. देवाच्या कृपेने वाचलो असून हे एक पुनर्जीवन मिळाले आहे, असे रवींद्र सिंह यांनी सांगितले.
उसळत्या समुद्राशी दोन हात -
वादळामुळे जहाज भरकटले. जहाजात पाणी शिरले आणि ते बुडायला लागले. त्यामुळे आम्ही पाण्यात उड्या घेतल्या. दुसरा आमच्याकडे पर्याय नव्हता. डोक्याला, हातापायाला अनेक जखमा झाल्या. जीव वाचविण्यासाठी उसळत्या समुद्राशी दोन हात केले. अखेर दुपारी १२ वाजता नौसेनेने बाहेर काढले. आमच्या टीमपैकी मी एकटाच असल्याचे बार्ज ३०५चे वरिष्ठ अभियंता प्रमोद बरई यांनी सांगितले.
जीव वाचवण्यासाठी पाण्यात उड्या घेतल्या -
रात्रपाळीत काम करत होतो. समुद्राच्या मोठ्या लाटा उसळत होत्या. एक एक करुन नांगर तुटले आणि जहाज पाण्यावर तरंगायला लागले. दरम्यान, खडकांवर धडकून बुडू लागले. जीव वाचवण्यासाठी पाण्यात उड्या घेतल्याचे जहाज मॅकेनिक अभियंता संदीप सिंह यांनी सांगितले. चक्रीवादळ येणार असल्याचे माहित होते. परंतु, आम्ही ठरवू शकत नाही, जहाजावर जायचं की नाही ते ठरवत नसल्याचे ही ते म्हणाले.
सर्वजण सुखरुप -
चक्रीवादळामुळे जहाज कंट्रोलच्या बाहेर गेले. पालघरमध्ये जहाज बुडायला लागले. एकूण १२७ लोक यावेळी जहाजात होतो. तीन दिवस आम्हाला जेवण, पाणी काहीही मिळाल नाही. मदतीसाठी सातत्याने भारतीय नौसेनेच्या संपर्कात होतो. अखेर आज नौसेने आम्हाला बाहेर काढले. सर्वजण सुखरुप आहेत, असे अविनाश ऐडके यांनी सांगितले. कठीण परिस्थितीतून नौसेनेला आम्हाला बाहेर काढले. त्यामुळे त्यांना सलाम असेही ऐडके म्हणाले.

Last Updated : May 18, 2021, 10:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.