मुंबई - मुंबईसह महाराष्ट्र राज्यात कोरोना रुग्णांची संख्या खूप झपाट्याने वाढत आहे. प्रतिदिन महाराष्ट्रात 50 हजारांपेक्षा अधिक कोरोना रुग्णसंख्येची भर पडत आहे. त्यामुळे राज्य सरकार चिंतेत असून मागील एका आठवड्यापासून राज्यात कोरोनावर आळा घालण्यासाठी कडक निर्बंध लावण्यात आले असून लोकांनी याचे पालन करावे, अशा सूचना प्रशासनाने जनतेला दिल्या आहेत. आज व उद्या दोन दिवसीय पूर्ण लॉकडाऊनची घोषणा राज्य सरकारने केली आहे. या लॉकडाऊनच्या दरम्यान सुद्धा दारूच्या दुकानासमोरील गर्दी ही अद्याप कमी झालेली नाही. मुंबईमधील चेंबूर परिसरामधील चेंबूर नाका येथील एका दारूच्या दुकानासमोर लोकांनी आज दारू घेण्यासाठी गर्दी केल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळालं.
मिनी लॉकडाऊनमध्येही मुंबईतील वाईन शॉपसमोर मद्यपींची गर्दी - Crowds of people at the wine shop
राज्यात वीकेंड लॉकडाऊनची घोषणा झाली आहे. लॉकडाऊन दरम्यान सुद्धा दारूच्या दुकानासमोरील गर्दी ही अद्याप कमी झालेली नाही. मुंबईमधील चेंबूर परिसरामधील चेंबूर नाका येथील एका दारूच्या दुकानासमोर लोकांनी आज दारू घेण्यासाठी गर्दी केल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळाले.