ETV Bharat / city

पिकनिकला जाताय, सावधान!!! राज्यात सापडले अतिघातक कोरोना डेल्टा प्लसचे २१ रुग्ण - लोणावळा पर्यटन

कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या केसेस राज्यात वाढत आहे आणि दुसरीकडे पिकनिक स्पॉटवर गर्दी वाढत आहे, पिकनिक स्पॉट हे डेल्टा प्लसचे मुख्य कारण ठरण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनाची दुसरीलाट वाढण्याआधी लोकांनी होळी-रंगपंचमी सण मोठ्याप्रमाणात साजरा केला होता. मात्र आता कोणताही मोठा सण-उत्सव नाही मात्र राज्यात चांगला पाऊस होत असून पिकनिक स्पॉटवर लोकांची वाढत असलेली गर्दी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे.

डेल्टा प्लस व्हेरियंटचे हॉटस्पॉट
डेल्टा प्लस व्हेरियंटचे हॉटस्पॉट
author img

By

Published : Jun 23, 2021, 1:09 PM IST

Updated : Jun 23, 2021, 1:38 PM IST

मुंबई - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता ओसरल्यानंतर राज्यात लॉकडाऊन शिथिल करण्यात आला. मात्र, राज्यात मान्सूनचे आगमन आणि लॉकडाऊनची शिथिलता ही वेळ जुळून आल्याने राज्यातील निर्सगप्रेमी पर्यटकांना पर्यटनस्थळे आकर्षित करू लागली आहेत. त्यामुळे पर्यटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. तर दुसरीकडे राज्यात कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या केसेस वाढत आहेत, अशा परिस्थितीत पिकनिक स्पॉटवर वाढणारी गर्दी डेल्टा प्लसचे रुग्ण वाढीसाठी मुख्य कारण ठरू शकते. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील कोणकोणत्या ठिकाणी पर्यटक गर्दी करत आहेत आणि ते कोरोनाच्या डेल्टा प्लसचा प्रादुर्भाव वाढण्याच्या दृष्टीने कशा प्रकार धोकादायक या संदर्भातील ईटीव्ही भारतचे हे विशेष वृत्त..

पुणे
भुशी धरण

कोरोनाच्या संसर्गाचे अधिक प्रमाण असलेल्या डेल्टा प्लस व्हेरियंटचे महाराष्ट्रात २१ रुग्ण आढळले आहेत. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे. डेल्टा प्लसचे रत्नागिरीत ९, जळगावात ७ तर मुंबईत २ रुग्ण आढळले आहेत. याशिवाय पालघर, ठाणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येकी एक रुग्ण डेल्टा प्लसने बाधित झाल्याचे आढळून आले आहेत. तर जळगावात डेल्टा प्लसचे ७ रुग्ण आढळले आहेत. ही रुग्णसंख्या तिसऱ्या लाटेपूर्वीची राज्यासाठी पूर्वसूचना देणारी धोक्याची घंटा समजायला हवे असे जाणकांरांचे मत आहे.

तिसऱ्या लाटेला कारणीभूत ठरणार डेल्टा प्लस?

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी गेल्या वर्षीपासून राज्यात सण उत्सव साजरे करण्यावर बंदी घालण्यात आली. त्यानंतर दिवाळी काळात पहिली लाट ओसरल्याने राज्य अनलॉक झाले. मात्र, वाढत्या गर्दीने आणि कोरोना प्रतिबंधात्मक लस नसल्याने राज्यासह भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले. जानेवारी पासून लसीकरणाला सुरुवात झाली. मात्र, आता डेल्टा व्हेरीएंट नावाचे कोरोना विषाणूचे नवीन रुप समोर आले आहे. कोरोनावरील लशीला आणि अँटीबॉडीजला डेल्टा प्लस जुमानत नाही, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. इतका हा विषाणू भयानक आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका तज्ञांनी व्यक्त केला आहे. या लाटेला डेल्टा प्लस कारणीभूत ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सद्यस्थितीत कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. त्यामुळे राज्यातील लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली. मात्र, सध्या राज्यात नुकतेच मान्सूनचे आगमन झाले आहे. त्यामुळे अनेक पर्यटनस्थळावर नागरिकांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे कोरोनाच्या नियमांचे पालन होत नसल्याचे चित्र पर्यटनस्थळावर पाहायला मिळत आहे. तसेच मुसळधार पावसामुळे धबधब्याच्या ठिकाणी पर्यटक गर्दी करत असल्याने योग्य काळजी न घेतल्याने इतर दुर्घटना घडत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. नुकतेच छिंदवाडा येथील धबधबध्यावर आलेल्या अनेक पर्यटकांनी कोरोना नियमांना धाब्यावर बसवल्याचे पाहायला मिळाले. नागपुरातील एक कुटुंब वाढदिवस साजरा करण्यासाठी सौसरमधील घोगरा धबधब्यावर गेले होते. नदीच्या मध्यभागी बसून केक कापण्याची त्यांची योजना होती. मात्र, अचानक नदीला पूर आला आणि कुटुंबातील 12 जण पूरात अडकले. पूरातून त्यांची सुटका करण्यात आल्याचा प्रकार ही समोर आला आहे.

पालघरच्या आशेरी गडावर पर्यटकांची गर्दी-

पालघर जिल्ह्यातील वाडा-खडकोना या गावातील आशेरी गडावर पर्यटकांनी मोठी गर्दी केल्याचे पहायला मिळात आहे. त्यामुळे कोरोनाचे नियम धाब्यावर बसवले होते. गडावर पर्यटकांनी तुफान गर्दी करत प्रशासनाने ठरवून दिलेले नियम पायदळी तुडविले होते. पावसामुळे हा परिसर हिरवळीने नटला असल्याने पालघरसह, मुंबई, ठाणे, गुजरात या बड्या शहरातील हजारो पर्यटक गडावर दाखल झाले होते.

डेल्टा प्लस व्हेरियंटचे हॉटस्पॉट
अशेरीगड पर्यटकांची गर्दी

लोणावळ्यातील गर्दी धोकादायक-

लोणावळ्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. आठवडाभरापासून शहरासह परिसरात वरून राजाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे मुंबई आणि पुणेकर पर्यटकांना आकर्षित करणारे धबधबे ओसंडून वाहू लागले आहेत. या ठिकाणी पर्यटक लोणावळ्यातील विविध पर्यटनस्थळी हजेरी लावून कुटुंबासह मनमुराद आनंद लुटताना मोठ्या प्रमाणात गर्दीही करत आहेत. या ठिकाणी पुणे, मुंबईसह, परराज्यातून आणि देशातून पर्यटक येथील पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी येत असतात. मात्र, कोरोनाच्या नियमांचे पालन होत नसल्याने लोणावळा हे शहर कोरोनाच्या डेल्टा प्लस या व्हेरियंटच्या प्रसाराचे हॉटस्पॉट ठरू शकते.

पर्यटन
खंडाळा घाटातील पर्यटन स्थळांवर गर्दी

विदर्भातील चिखलधराही गर्दीचे पर्यटन स्थळ-

अमरावती जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर घटली आहे. त्यामुळे अमरावती जिल्हाही अनलॉक झाला. त्यामुळे विदर्भाचे पर्यटन स्थळ असलेल्या चिखलदऱ्यामध्ये पर्यटकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी करायला सुरुवात केली आहे. पावसाळ्यात चिखलदऱ्यामधील सर्वच पिकनिक पॉईंट पर्यटकांना आकर्षित करतात,. त्यामुळे अरवती जिल्ह्यातील चिखलधरा येथे होणारी गर्दी आणि कोरोना नियमांचे पालन झाल्यास ही पर्यटनस्थळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रसार करण्यासाठी पुरक ठरणारी असल्याचे जाणकारांचे मत आहे.

खंडाळ्यात पर्यटकांची वाढती गर्दी-

थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाणारे लोणावळा-खंडाळा येथे दरवर्षी पर्यटकांनी गजबजून जाते. नुकताच कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाला आहे. दरम्यान, अनेक दिवसांपासून घराबाहेर न पडलेले लोक आणि विशेषतः तरुणाई आता पावसाचा आनंद घेत आहे. या घाटात रिमझिम पावसाबरोबर येणाऱ्या धुक्याचे प्रमाणही वाढत आहे. हे थंड हवेचे ठिकाण असल्याने पर्यटक येथे मोठा आनंद लुटतात. हा खंडाळा घाट मुंबईपासून जवळ असल्याने, मुंबईला जाणारे बहुतांश लोक इथे काही काळ थांबतात. खंडाळा येथे अमृतांजन ब्रिज, राजमाची किल्ला, राजमाची पॉईंट, खंडाळा घाट, दस्तुरी घाट आदी पर्यटकांना पाहायला असल्यामुळे, पर्यटक याठिकाणी हवेतील गारव्याचा आनंद लुटण्यासाठी आवर्जून येत आहेत. त्यामुळे खंडाळा घाटातील पर्यटनस्थळे देखील डेल्टा प्लसच्या प्रादुर्भाव वाढीसाठी धोकादायक ठरू शकतात.

डेल्टा प्लस व्हेरियंटचे हॉटस्पॉट
भुशी़ धरण

भुशी धरणावर पोलीस बंदोबस्त-

भुशी धरण ओव्हर फ्लो झाले असे म्हटले की हजारो पर्यटक लोणावळ्याच्या दिशेने येतात. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या पुणे जिल्ह्यात पर्यटनबंदी आहे. त्यामुळं काही पर्यटक हे बंदी धुडकावून भुशी धरणावर पोहोचत आहेत. दरम्यान, यावर्षी धरण काही दिवस अगोदर ओव्हर फ्लो झाल्याचे पाहायला मिळालं आहे. या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात गर्दी होते. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने या ठिकाणी प्रशासनाने पर्यटकांना बंदी घातली आहे.

याच बरोबर सह्याद्री पर्वतारांगेतील घाट माथा, गडकिल्ले या ठिकाणी पावसाळ्यातील वातावरण अल्हाददायक असते. त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांची गर्दी हमखास वाढते. त्याच बरोबर कोल्हापूरमधील आंबोली घाट, फोंडा घाट, नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, पुणे जिल्ह्यातील लोणावळा, माळशेज, जुन्नर या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. मात्र, पर्यटकांकडून कोरोना नियमांचे पालन योग्य प्रमाणात केले जात नाही. परिणामी कोरोनाची संभाव्य तिसरी लाट आणि नवा व्हेरियंट डेल्टा प्लसच्या धोका वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सद्यस्थितीत राज्यातील ही पर्यटनस्थळे डेल्टा प्लसचा प्रादुर्भाव वाढवणारी हॉटस्पॉट केंद्र ठरू शकतात, अशी शक्यता नाकारता येत नाही.

काय आहे डेल्टा प्लस व्हेरिएन्ट?

भारतात सर्वप्रथम आढळून आलेल्या डेल्टा म्हणजेच बी. १.६१७.२ या कोरोना विषाणू उत्परिवर्तनात आणखी उत्परिवर्तन घडून विषाणूचा डेल्टा प्लस हा नवा व्हेरियंट तयार झाला आहे. मोनोक्लोनल अँटिबॉडी कॉकटेल उपचार पद्धती या विषाणूचा प्रतिकार करते की नाही, हे समजून घेण्यासाठी संशोधन सुरू आहे.

कोरोना विषाणू हा वारंवार आपले रुप बदलताना दिसून येत आहे. आधी आफ्रिका, मग लंडन आणि अशाच काही देशांनंतर भारतातही या विषाणूचे नवे स्ट्रेन दिसून आले आहेत. भारतातील या स्ट्रेन्सना डेल्टा आणि काप्पा अशी नावं देण्यात आली होती. यामधील डेल्टा स्ट्रेनचा 'डेल्टा प्लस' हा व्हेरिएंट अधिक घातक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. तसेच, कोरोनावर उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांचा या व्हेरिएंटवर कितपत परिणाम होतो याबाबतही साशंकता असल्याचे डॉ. शीतल वर्मा यांनी म्हटले आहे. त्या केजीएमयूमध्ये मायक्रोबायोलॉजिस्ट आहेत.

Last Updated : Jun 23, 2021, 1:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.