मुंबई - शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांचा मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर पनवेलजवळ झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच संपूर्ण राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे पहाटे झालेल्या या अपघाताची बातमी समजताच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पनवेल येथे एमजीएम रुग्णालयात जाऊन विनायक मेटे यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले Vinayak Mete passed away in Accident पनवेलमधील रुग्णालयातून विनायक मेटे यांचे पार्थिव त्यांच्या मुंबई येथील वडाळा परिसरात असलेल्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. यावेळी सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांनी या निवासस्थानी येऊनं त्यांचे अंत्यदर्शन घेतले.
पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले - या वेळी भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रवीण दरेकर आमदार भारती लवेकर मंत्री मंगल प्रभात लोढा या नेत्यांनी दर्शन घेतले तर शिवसेनेकडून खासदार अनिल देसाई आमदार सचिन अहिर माजी मंत्री दीपक सावंत खासदार विनायक राऊत तसेच काँग्रेसकडून मुंबई प्रदेशाध्यक्ष भाई जगताप त्यांनी त्यांच्या निवासस्थानी येऊन विनायक मेटे यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ट्रॉमा केअर सेंटरचा आवश्यकता विनायक मेटे यांचा अपघात झाल्यानंतर त्यांना उपचार आणि मदत हे उशिरा मिळाले असल्याचा आरोप त्यांच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येतो विनायक मेटे यांच्यासोबत असलेल्या ड्रायव्हर नाही मदत उशिरा पोहोचल्याचे सांगितले होते यावर बोलताना शिवसेना नेते दीपक सावंत म्हणाले की मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर जवळपास रोजच अपघात होतो शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांचाही पनवेलजवळ अपघात झाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला
द्रुतगती मार्गावर भरपूर अपघात गेल्या अनेक वर्षापासून मुंबई द्रुतगती महामार्गावर ट्रॉमा केअर सेंटर मांडण्याची आवश्यकता आहे राज्याचे मुख्यमंत्री हे एम एस आर डी सी विभागाचे मंत्री असताना त्यांनी सोमा केअर सेंटर बनवण्याबाबत आश्वासन दिल होत आतापर्यंत या द्रुतगती मार्गावर भरपूर अपघात झाले ट्रॉमा केअर सेंटर झाल्यास अपघातग्रस्तांना तातडीने मदत पोहोचू शकेल असे मत शिवसेना नेते आणि राज्याचे माजी आरोग्य मंत्री दीपक सावंत यांनी व्यक्त केला तसेच विनायक मेटे यांना रस्ते मार्गाने बीडला त्यांच्या निवासस्थानी अंत्यसंस्कारांसाठी घेऊन जावं लागणार आहे त्यासाठी त्यांचे पार्थिव व्यवस्थित राहावे यासाठी जे जे रुग्णालयात येऊन इंजेक्शन द्यावं लागले. पार्थिव व्यवस्थित राहावे यासाठी विनायक मेटे त्यांना जे जे रुग्णालयात आणावा लागेल केवळ जे जे रुग्णालयातच असे इंजेक्शन दिले जाते त्यामुळे इतर खासगी आणि शासकीय रुग्णालयातील ही सुविधा उभी करण्यात यावी अशी मागणी दीपक सावंत यांनी केली आहे
हेही वाचा - Devendra Fadnavis निवडणूक आमच्यासोबत अन् विरोधकांशी हातमिळवणी फडणवीसांचा ठाकरेंना सवाल