ETV Bharat / city

गृहकर्ज व्याजदर 5 टक्के करा; क्रेडाईची ऑनलाइन मोहिमेतून केंद्राकडे मागणी

कोरोना आणि लॉकडाऊनचा बांधकाम व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. या नुकसानीतून वर येण्यासाठी बांधकाम व्यवसायाला मोठा काळ जावा लागणार आहे. देशात पहिली टाळेबंदी घोषित केल्यापासून साडेतीन महिने अनेक ठिकाणी बांधकाम बंद आहेत.

संग्रहित
संग्रहित
author img

By

Published : Jul 9, 2020, 12:20 PM IST

मुंबई- घरखरेदी-विक्रीला चालना देण्यासाठी गृहकर्ज व्याजदर सरसकट 5 टक्के करावे, अशी मागणी बांधकाम क्षेत्रातील आघाडीच्या क्रेडाई संघटनेने केली आहे. यासाठी क्रेडाई ऑनलाइन मोहिम सुरू केली आहे. या माध्यमातून क्रेडाईने केंद्र सरकारकडे मागणी उचलून धरली आहे.

कोरोना आणि लॉकडाऊनचा बांधकाम व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. या नुकसानीतून वर येण्यासाठी बांधकाम व्यवसायाला मोठा काळ जावा लागणार आहे. देशात पहिली टाळेबंदी घोषित केल्यापासून साडेतीन महिने अनेक ठिकाणी बांधकाम बंद आहे. काही ठिकाणी बांधकाम मजूर नसल्याने तर काही ठिकाणी भांडवलाअभावी कामे बंद आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून ग्राहकांचा प्रतिसाद नसल्याने घरांची विक्री ठप्प आहे. महागडी घरे असल्याने ग्राहकांनी घरखरेदीचे निर्णय लांबणीवर टाकण्यावर सुरुवात केली आहे.

विक्री न झालेली घरे व नवीन प्रकल्पातील घरांची विक्री करण्यासाठी बांधकाम विकासक प्रयत्न करत आहेत. केंद्र सरकारने गृहकर्जाचा व्याजदर कमी करून 5 टक्के करण्याची मागणी क्रेडाईने केली आहे. सध्या गृहकर्ज व्याजदर सुमारे 8 टक्के आहे. टाळेबंदीमुळे कर्माची कपात होत असल्याने बेरोजगारीत वाढ आहे. तर अनेक व संस्थांनी वेतन कपात केली आहे. अशा स्थितीत गृहकर्ज फेडणे अनेकांना कठीण जाणार आहे. तर नवीन ग्राहक गृहकर्जाचा मासिक हप्ता भरणे शक्य नसल्याने नवीन घर विकत घेणे टाळत आहेत.

हीच परिस्थिती कायम राहिल्यास मंदीचा सामना करणाऱ्या बांधकाम व्यवसायाला आणखी फटका बसणार आहे. त्यामुळेच गृहकर्ज व्याजदर कमी करत ग्राहकांना दिलासा द्यावा, अशी बांधकाम व्यवसाय संघटनेने मागणी केली आहे. ही मागणी पूर्ण झाली तर ग्राहक घरखरेदीकडे आकर्षित होतील, अशी क्रेडाईची अपेक्षा आहे. त्यासाठी त्यांनी ऑनलाइन मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेला 40 हजारांहून अधिक बांधकाम व्यवसायिकांनी पाठिंबा दिला आहे. यावर केंद्र सरकार काय भूमिका घेते, याकडे बांधकाम व्यावसायिकांसह ग्राहकांचे लक्ष लागलेले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.