ETV Bharat / city

BMC Covid Expenditure : पालिकेने केलेल्या कोविडवरील खर्चाच्या ३ हजार कोटींची सरकारकडून शून्य प्रतिपूर्ती - महाराष्ट्र सरकार

मुंबई महापालिकेने कोविडवर ( BMC Covid Expenditure ) २७६४ कोटी सप्टेंबरपर्यंत खर्च केले. ५०० कोटी रुपये तिसऱ्या लाटेत खर्च केले आहेत. २७६४ कोटीपैकी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यलयाकडे १४१७ तर उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे १३४७ कोटींची प्रतिपूर्ती करण्याचा दावा केला आहे.

bmc
bmc
author img

By

Published : Feb 24, 2022, 7:37 PM IST

मुंबई - शहरात गेले २ वर्षे कोरोना विषाणूचा (Corona outburst in Mumbai) प्रसार आहे. हा प्रसार रोखण्यासाठी पालिका प्रशासन उपायोजना करत आहे. त्यासाठी आतापर्यंत तब्बल ३३०० कोटी रुपये खर्च झाले आहेत. या खर्चाची प्रतिपूर्ती करावी म्हणून राज्य सरकारकडे ३ हजार कोटी रुपयांचे प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत. ही रक्कम पालिकेला आतापर्यंत परत मिळाली नसल्याचे समोर आले आहे. यामुळे पालिकेला ही रक्कम परत मिळणार का याबाबात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

आतापर्यंत ३३०० कोटी रुपये खर्च
मुंबईमध्ये मार्च २०२० मध्ये कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर कोरोनाचा प्रसार वाढत गेला. गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या तीन लाटा आल्या. या तीनही लाटा थोपवण्यात पालिका प्रशासनाला यश आले आहे. या दोन वर्षात ० लाख ५५ हजार ९६० रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ३५ हजार १६९ रुग्ण बरे झाले आहेत. तर १६ हजार ६९० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पालिकेने जम्बो कोविड सेंटर उभारली. त्यात आयसीयू, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन पुरवठा, लहान मुलांचे वॉर्ड, औषधें, इंजेक्शन, पीपीई किट, मास्क आदीवर आतापर्यंत ३३०० कोटी रुपये महापालिकेने खर्च केले आहेत.

३ हजार कोटींचे दावे -
मुंबई महापालिकेने कोविडवर २७६४ कोटी सप्टेंबरपर्यंत खर्च केले. ५०० कोटी रुपये तिसऱ्या लाटेत खर्च केले आहेत. २७६४ कोटीपैकी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यलयाकडे १४१७ तर उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे १३४७ कोटींची प्रतिपूर्ती करण्याचा दावा केला आहे. ही रक्कम राज्य सरकार पालिकेला परत करेल अशी अपेक्षा पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी अर्थसंकल्पानंतर आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केली होती. आता खर्चाची ही रक्कम वाढून ३३०० कोटी रुपयांपर्यंत गेली आहे. याबाबत आतापर्यंत ३ हजार कोटींचे दावे दाखल केले आहेत. दर ३ महिन्यांनी हे दावे दाखल केले जातात अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

१० लाख ५५ हजार ९६० रुग्णांची नोंद -
मुंबईत आतापर्यंत एकूण १० लाख ५५ हजार ९६० रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ३५ हजार १६९ रुग्ण बरे झाले आहेत. तर १६ हजार ६९० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १२२८ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ३७५८ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. १६ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी या कालावधीत कोरोना वाढीचा दर ०.०२ टक्के इतका आहे.

हेही वाचा - Nawab Malik : अंडरवर्ल्डशी संबंध प्रकरणी ईडीने सादर केली 1989 ची तक्रार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.