ETV Bharat / city

सचिन वाझेचा ताबा ईडीला द्यायला न्यायालयाचा नकार - Mumbai police

शंभर कोटींच्या वसूलीप्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीच्या ताब्यात आहे. या प्रकरणी जबाब नोंदवूण घेण्यासाठी ईडीने बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेचा ताबा मागितला होता. मात्र, न्यायालयाने ईडीला वाझेचा ताबा देण्यास नकार दिला आहे.

सचिन वाझे
सचिन वाझे
author img

By

Published : Nov 9, 2021, 7:30 PM IST

मुंबई - शंभर कोटींच्या वसूलीप्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीच्या ताब्यात आहे. तर अँटिलिया बॉम्ब प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्याकांड प्रकरणी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे सध्या मुंबई गुन्हे शाखा 11 च्या ताब्यात आहे. अशातच आता ईडीने वाझेचा ताबा आपल्याला मिळावा यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. यास मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने यास विरोध केला होता. न्यायालयाने वाझेचा ताबा ईडीला देण्यास नकार दिला आहे.

माहिती देताना सरकारी वकील

अँटिलिया स्फोटके आणि व्यापारी मनसुख हिरेन हत्या प्रकरणी एनआयए या केंद्रीय तपास यंत्रणेने सचिन वाझेला अटक केली आहे. तो तळोजा कारागृहात होता. एक नोव्हेंबर रोजी गोरेगाव येथील एका गुन्ह्यात त्याचा ताबा मुंबई गुन्हे शाखेने घेतला आहे. गोरेगाव येथील एका खंडणी प्रकरणात तपासणीसाठी मुंबई गुन्हे शाखा तपास करणार आहे.

माजी गृहमंत्री देशमुख यांनी दिलेला जबाब पडताळण्यासाठी सचिन वाझेच्या जाबाबाची गरज असल्याने ईडीने वाझेचा ताबा मागितला. मात्र, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे वाझेची कोठडी 13 नोव्हेंबरपर्यंतची आहे. पोलीस कोठडी संपल्यानंतर आम्ही वाझेचा ताबा एनआयएकडे सोपवू, त्यानंतर ज्याचा वाझेची कोठडी हवी असेल ते घेऊ शकतात, असा युक्तीवाद सरकारी वकिलांनी केला. हा युक्तीवाद ग्राह्य मानून न्यायाधीशांनी वाझेचा ताबा ईडीला देण्यास नकार दिला आहे.

हे ही वाचा - क्रांती रेडकर यांनी घेतली राज्यपाल कोश्यारी यांची भेट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.