लग्न जमलेल्या प्रेमीयुगुलाची आत्महत्या, तर्क वितर्कांना उधाण.. - Couple suicide in Mumbai
नवी मुंबईतील घणसोलीमध्ये प्रेमीयुगुलाने आत्महत्या केल्याची घटना घडली. विशेष म्हणजे दोघांचे गेल्याच वर्षी लग्न जुळले होते. त्यामुळे त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय का घेतला असावा याबाबत विविध तर्क वितर्क केले जात आहेत.
नवी मुंबई - शहरामध्ये एका नवीन लग्न जमलेल्या प्रेमीयुगुलाने आत्महत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. मुलाच्या घरीच दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. या दोघांचे लग्न जमलेले असतानाही यांनी आत्महत्या का केली असावी यावरून तर्क वितर्क लावले जात आहेत.
घणसोलीमध्ये सिम्लेक्स सोसायटीमध्ये दत्ता वरे हा तरुण आपल्या कुटुंबीयांसह राहत होता. साक्षी गोळे या तरुणीशी त्याचे नोव्हेंबर २०१८ मध्ये लग्न जमले होते. मिळालेल्या माहितीनुसार, दोघांचेही एकमेकांवर प्रेम होते. त्यांच्या कुटुंबीयांचा सुरुवातीला त्यांच्या लग्नाला विरोध होता, मात्र नंतर त्यांना घरूनदेखील पाठिंबा मिळाला. तरीही दोन्ही कुटुंबीयांमधील तणाव संपण्याची चिन्हे दिसत नव्हती. त्यामुळे ठरलेले लग्न मोडते की काय अशा भीतीने त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे.
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. घणसोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, सदर तपास सुरू आहे.
हेही वाचा : कर्णपुरा यात्रेत पायी जाणाऱ्या ६ मित्रांना भरधाव बसने चिरडले; २ ठार
सोबत फोटो जोडले आहेत
नवी मुंबईत लग्न जमलेल्या एका प्रेमीयुगुलाने आत्महत्या केल्याची घटना घडलीये. घणसोलीतल्या सिम्प्लेक्स सोसायटीत राहणाऱ्या मुलाच्या घरीच दोघांनी गळफास घेऊन ही आत्महत्या केल्यानं संपूर्ण नवी मुंबई शहरात एकच खळबळ माजली आहे. विशेष बाब म्हणजे या दोघांचं लग्न जमलं असतानाही त्यांनी आपलं जीवन संपवण्याचा निर्णय का घेतला ? यावरून अनेक तर्क वितर्क लावले जात आहेतBody:दत्ता वरे आणि साक्षी गोळे अशी या दोघांची नावं आहेत. नोव्हेंबर 2018 मध्ये या दोघांचं लग्न ही जमलं होत. मूळचा साताऱ्यातील वाई तालुक्यातील असलेला दत्ता वारे हा घणसोली मधील सिम्प्लेक्स सोसायटीत कुटुंबियांसोबत राहत होता.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोघांचेही परस्परांवर प्रेम होते. त्यांनी एकत्र जगण्या-मरण्याच्या आणाभाका घेतल्या होत्या. पण, त्यांच्या प्रेमाला कुटुंबीयांचा विरोध होता. गेल्या काही दिवसांपासून दोघांचेही कुटुंबीय तणावात होते. . लग्न जमलं जरी असलं तर लग्नासाठी कुटुंबामध्ये अनेक अडचणी येत होत्या. यालाच कंटाळून अखेर मुलगी साक्षी गोळे आणि मुलगा दत्ता वरे या दोघांनीही एकत्र जीवन संपवण्याचा टोकाचा मार्ग निवडला. साक्षी गोळे ही दत्ता वरेच्या घरी आली, आणि त्याच्याच घरी दोघानी एकत्र गळफास घेऊन ही आत्महत्या केली.
Conclusion:या घटनेमुळे नवी मुंबई परिसरात एकच खळबळ माजली आहे. घणसोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून सदर तपास सुरू आहे.