ETV Bharat / city

कॉसिस कंपनी तळेगावात 2,823 कोटींची करणार गुंतवणूक; महाराष्ट्र सरकारबरोबर सामंजस्य करार - इलेक्ट्रिक वाहन उत्पादन

बदलत्या तंत्रज्ञानानुसार महाराष्ट्राची ई मोबिलिटीकडे वाटचाल सुरू आहे. कॉसिसमार्फत तळेगाव येथे 2,823 कोटींची गुंतवणूक प्रस्तावित आहे. या प्रकल्पातून 1,250 रोजगार निर्मिती होणार आहे.

सुभाष देसाई
सुभाष देसाई
author img

By

Published : Oct 1, 2021, 7:43 PM IST

मुंबई - महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन वाढण्यासाठी आणखी पोषक वातावरण होणार आहे. ग्लंडची कॉसिस ई मॅबिलिटी कंपनी पुणे जिल्ह्यातील तळेगावत 2,823 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. त्यासाठी कंपनीने उद्योग विभागाशी सामंजस्य करार केला आहे.

राज्य सरकारने इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) धोरणाची अंमलबजावणी सुरू केली आहे. ई-मोबिलिटी उत्पादन आणि पायाभूत सुविधा विकास क्षेत्रात कॉसिस कंपनीकडून गुंतवणूक केली जात आहे. या कंपनीला राज्य सरकारकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दिले.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) आणि 'कॉसिस' ई मोबिलिटी कंपनीदरम्यान पुणेजवळ तळेगाव येथे इलेक्ट्रिक वाहन उत्पादन करण्याबाबत सामंजस्य करार करण्यात आला. हा करार सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या कार्यक्रमात करण्यात आला. शून्य उत्सर्जन व पर्यावरणपूरक वाहन निर्मिती क्षेत्राला चालना देण्यासाठी उद्योग विभाग व इंग्लंडच्या कॉसिस इ मोबिलीटी कंपनी यांच्यात 2,823 कोटी रुपयांच्या गुंतवणूकीच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा-सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडिया आणि झी एन्टरटेनमेंटमध्ये विलिनीकरण करार, झीच्या संचालक मंडळाने दिली मंजुरी

राज्यात उद्योगांना पोषक वातावरण

उद्योगमंत्री देसाई म्हणाले, की राज्याच्या पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहन धोरणाच्या अंमलबजावणीची नागरिक आतुरतेने वाट पाहत आहेत. यासाठी राज्याच्यावतीने ईव्ही क्षेत्रात गुंतवणुकीसाठी उद्योजकांचे स्वागत करण्यात येत आहे. राज्यात उद्योगांना पोषक वातावरण आहे. सर्व आवश्यक सुविधा पुरविण्यात येत आहेत. कॉसिस कंपनीलाही संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, असे सांगून त्यांनी कंपनीचे राज्यात स्वागत केले.

हेही वाचा-फ्लिपकार्ट-अॅमेझॉन नाही; 'या' ई-कॉमर्स वेबसाईटवरून सर्वप्रथम आयफोन 13 ची डिलिव्हरी

महाराष्ट्राची ई मोबिलिटीकडे वाटचाल

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्याच्या ईव्ही धोरणाबाबत माहिती दिली. प्रदूषण कमी करणे ही आजची गरज आहे. बदलत्या तंत्रज्ञानानुसार महाराष्ट्राची ई मोबिलिटीकडे वाटचाल सुरू आहे. वातावरणीय बदलाच्या अनुषंगाने अत्यावश्यक बाबींचा स्वीकार करण्याचे राज्याचे धोरण आहे. गुंतवणूक करीत असल्याबद्दल त्यांनी कॉसिस कंपनीचे स्वागत केले.

राज्यातील पायाभूत सुविधाही उत्तम

प्रदूषण मुक्तीसाठी महाराष्ट्राने उद्योग आणि पर्यावरण क्षेत्रात महत्वपूर्ण निर्णय घेतल्याचे कॉसिसचे तुमुलुरी आणि पंगा यांनी सांगितले. उद्योगांसाठी राज्यातील पायाभूत सुविधाही उत्तम असल्याचे ते म्हणाले. एमआयडीसीकडून व्यावसायिक दर्जाचा प्रतिसाद लाभल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले.

हेही वाचा-येत्या ऑक्टोबर महिन्यात देशभरातील बॅंका राहणार तब्बल २१ दिवस बंद

महाराष्ट्र हे उद्योगांच्या पसंतीचे राज्य-

अपर मुख्य सचिव बलदेव सिंग यांनी प्रास्ताविकात महाराष्ट्र हे विदेशी गुंतवणुकीत आघाडीचे आणि उद्योजकांच्या पसंतीचे राज्य असल्याचे सांगितले.

असा आहे कॉसिसचा उत्पादन प्रकल्प

कॉसिसमार्फत तळेगाव येथे 2,823 कोटींची गुंतवणूक प्रस्तावित आहे. या प्रकल्पातून 1,250 रोजगार निर्मिती होणार आहे. तसेच यामुळे वातावरण बदल नियंत्रण करण्यासही मदत होईल. कॉसिस समुहाद्वारे पहिल्या टप्प्यात ईव्ही बॅटरीचा पुरवठा करण्यासाठी इग्लंड येथे मोठा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात कारखाना उभारण्यात येणार आहे. यामुळे राज्यातील विकसित इको सिस्टीमला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

बैठकीला हे मंत्री व अधिकारी होते उपस्थित-

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव बलदेव सिंग, विकास आयुक्त हर्षदीप कांबळे, एमआयडीसी चे मुख्य कार्यकारी अधिकारी पी अन्बलगन, कॉसिस ग्रुप चे संस्थापक आणि संचालक राम तुमुलुरी आदी उपस्थित होते. एमआयडीसीच्या वतीने पी अन्बलगन यांनी तर कॉसिसच्या वतीने संचालक रवीकुमार पंगा यांनी करारावर स्वाक्षरी केली.

दरम्यान, पुणे हे देशातील महत्त्वाचे ऑटोहब म्हणून ओळखले जाते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.