ETV Bharat / city

...तर हेल्मेट घालून सभांना बसावे लागेल; मुंबईतील नगरसेवकांनी व्यक्त केली भीती

author img

By

Published : Dec 20, 2019, 12:04 PM IST

पालिकेच्या मुख्यालयात एका सभेदरम्यान अचानक काच पडली. समिती अध्यक्षा प्रिती पाटणकर यांच्यासह तीन अधिकारी या घटनेत किरकोळ जखमी झाले आहेत. महापौर किशोरी पेडणेकर यांनी या घटनेची दखल घेतली आहे. पालिकेतील सर्व वस्तुंची तपासणी करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. काच पडल्याप्रकरणी दोषींवर कारवाई करावी, असे निर्देशही त्यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत.

bmc
प्रातिनिधीक छायाचित्र

मुंबई - पालिका मुख्यालयातील शहर स्थापत्य समितीच्या सभेत अचानक काच पडल्याची घटना घडली होती. या घटनेचे तीव्र पडसात स्थायी समितीच्या बैठकीत उमटले आहेत. महापालिका मुख्यालयातील समिती सभागृहांमध्ये लावण्यात आलेले झुंबर आणि काचेची तावदानेही पडतील, अशी भीती नगरसेवकांनी व्यक्त केली आहे. समितीचा कारभार चालवण्यासाठी हेल्मेट घालून बसावे लागेल, अशी टीका प्रशासनावर होत आहे. दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेत मुख्यालयातील सर्व इमारतींमधील काचेच्या तावदानांसह झुंबरांचे ऑडीट करावे, असे आदेश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रशासनाला दिले आहेत.

महापौर किशोरी पेडणेकर

समिती अध्यक्षा प्रिती पाटणकर यांच्यासह तीन अधिकारी या घटनेत किरकोळ जखमी झाले आहेत. सभागृहनेत्या विशाखा राऊत यांनी या घटनेबाबत हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. मुख्यालयातील सुशोभिकरणावर कोट्यवधी रुपये खर्च केल्यानंतरही दुर्घटना होत असल्यास जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न त्यांनी यावेळी विचारला आहे. तसेच, स्थायी समिती सभागृहातील कॅन्टींनमध्ये नाश्ता, जेवण करताना ताटात एसीचे पाणी टपकते. वारंवार तक्रार करुनही प्रशासन दखल घेत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा - 'अग्निसुरक्षा, आरोग्य प्रमाणपत्र नसताना मुंबईतील हॉटेल्स सुरू कशी'

काच पडल्याची घटना गंभीर आहे. पालिका लोकप्रतिनिधींबाबत प्रशासन किती उदासीन आहे याचे हे उदाहरण असल्याचे अरुंधती दुधवडकर यांनी म्हटले आहे. विरोधी पक्षनेते रवी राजा यांनीही यावेळी प्रशासनाच्या कारभारावर ताशेरे ओढले. दरम्यान, महापौर किशोरी पेडणेकर यांनीदेखील या घटनेची दखल घेतली आहे. पालिकेतील सर्व वस्तुंची तपासणी करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. काच पडल्याप्रकरणी दोषींवर कारवाई करावी, असे निर्देशही त्यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत.

Intro:मुंबई - पालिका मुख्यालयातील स्थापत्य समिती (शहर)च्या सभेत काच पडल्याचे तीव्र पडसात आज स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. महापालिका मुख्यालयातील विविध समिती सभागृहात लावण्यात आलेले झुंबर आणि काचेची तावदाने पडतील अशी नगरसेवकांनी तर स्थायी समिती अध्यक्षांनी समितीचा कारभार चालविण्यासाठी हेल्मेट घालून बसावे लागेल अशी भीती व्यक्त केली. तसेच पालिका मुख्यालयातील जुन्या व नवीन इमारतींमधील काचेच्या तावदानासह झुंबराचे ऑडीट करावे, असे आदेश जाधव यांनी प्रशासनाला दिले. Body:महापालिका मुख्यालयात बुधवारी स्थापत्य समिती (शहर)ची बैठक सुरु असताना सुशोभिकरणासाठी लावलेली काच पडली. समिती अध्यक्षा प्रिती पाटणकर यांच्यासह तीन अधिकारी या घटनेत किरकोळ जखमी झाले. सभागृहनेत्या विशाखा राऊत यांना घटनेबाबत हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. मुख्यालयातील सुशोभिकरणावर कोट्यवधी रुपये खर्च केल्यानंतरही दुर्घटना घडून अपघात झाल्यास जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न विचारला. मुख्यलयातील काच, झुंबर लावले असून तेही पडून दुर्घटना घडण्याची भिती व्यक्त केली. तसेच स्थायी समिती सभागृहातील कॅन्टींनमध्ये नाश्ता, जेवण करताना ताटात एसी (वातानुकूलित यंत्राचे) पाणी ठिपकते. वारंवार तक्रार करुनही प्रशासन दखल घेत नसल्याची खंत व्यक्त केली. काच पडल्याची गंभीर घटना आहे. पालिका लोकप्रतिनिधींबाबत प्रशासन किती उदासिन याचे हे उदाहरण आहे. ही काच मोठी असती आणि त्यात कोणी जखमी झाले असते तर याची जबाबदारी प्रशासनाने घेतली असती का, असा प्रश्न अरुंधती दुधवडकर केला. विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी प्रशासनाच्या गलथान कारभाराचा खरपूस समाचार घेतला.

स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनीही इमारतीच्या अंतर्गत देखभालीबद्दल चिंता व्यक्त केली. काल काच पडली पण आता मला डोक्यावरच्या झुंबराचीही भीती वाटू लागली आहे. उद्या सभागृहात येताना आणि स्थायी समितीच्या बैठकीला मला हेल्मेट घालून बसावे लागेल, असा टोला यशवंत जाधव यांनी पालिका प्रशासन आणि मेंटेनन्स विभागाला लगावला. या गंभीर प्रकरणाची प्रशासनाने दखल घ्यावी, तसेच काचेच्या तावदानासह झुंबरांचे ऑडीट करावे, असे आदेश देत हरकतीचा मुद्दा राखून ठेवला.

महापौरांनीही घेतली दखल -
समितीची बैठक सुरू असताना काच पडल्याने चार जण किरकोळ जखमी झाले आहेत. याठिकाणी वेगळ्या प्रकारची काच असती तर मोठी दुर्घटना घडली असती. पालिका सभागृहातही झुंबर आहेत. सभागृहात 227 नगरसेवक असतात. ही झुंबर मोठी असल्याने ती जर पडली तर जखमी होणाऱ्या नगरसेवकांची संख्या मोठी होईल. यामुळे पालिका सभागृहातील झुंबर, काचा व्यवस्थित आहेत की नाही याची पाहणी करण्यास सांगितले आहे. काच पडल्या प्रकरणी जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी असे निर्देश पालिका प्रशासनाला दिल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

महापौर किशोरी पेडणेकर यांचा बाईट Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.