मुंबई - मुंबई महानगरपालिका निवडणूक ( Mumbai Municipal Election 2022 ) होऊ घातली आहे. या निवडणुकीच्या आधीच शिवसेनेत फूट ( Split in Shiv Sena ) पडली आहे. यामुळे शिवसेना, इतर पक्षातील २० ते २५ नगरसेवक एकनाथ शिंदे गटात तर काही ( Eknath Shinde ) भाजपामध्ये प्रवेश करणार होते. मात्र, गेल्या काही दिवसात राजकीय परिस्थिती बदलली आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे ( Shiv Sena chief Uddhav Thackeray ) यांच्याबाबत सहानभूती निर्माण झाली आहे. यामुळे पक्षांतर करू इच्छिणारे माजी नगरसेवक आता पक्षांतर करावे कि करू नये अशा द्विधा मनस्थितीत आले आहेत.
शिवसेनेत फूट - २०१९ मध्ये शिवसेनेने आपला मित्रपक्ष भाजपासोबत युती तोडून राष्ट्रवादी काँग्रेस सोबत महाविकास आघाडी स्थापन ( Mahavikas Aghadi ) करून सरकार स्थापन केले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाला अडीच वर्षे पूर्ण झाल्यावर शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी ( Rebellion of Eknath Shinde ) केली. शिवसेनेचे ४० आमदार, १२ खासदार शिंदे यांनी फोडले. यामुळे शिवसेनेत फूट पडून उद्धव ठाकरे यांचे सरकार पडले. ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष, धनुष्यबाण या चिन्हावर दावा केला आहे. याबाबतचा वाद सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोगाकडे गेला आहे.
सरकार विरोधात वातावरण - शिवसेनेत फूट पडल्यावर मुंबईमधील प्रकाश सुर्वे, सदा सरवणकर, दिलीप लांडे, यामिनी जाधव, मंगेश कुडाळकर हे आमदार शिंदे गटात गेले आहेत. या आमदारांच्या संपर्कात असलेले तसेच इतर पक्षातील २० ते २५ माजी नगरसेवक आपली राजकीय कारकीर्द पुढे सुरु ठेवण्यासाठी शिंदे गट भाजपात प्रवेश करण्याच्या तयारीत होते. मात्र शिवसेनेचे नाव, धनुष्यबाण हे चिन्ह गोठवणे, उद्धव ठाकरे गटाला शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा न घेता यावा यासाठी कोर्टात जाणे आदी घडामोडींमुळे शिंदे, भाजपा सरकार विरोधात ( Atmosphere against Shinde government ) वातावरण निर्माण झाले आहे.
माजी नगरसेवक द्विधा मनस्थितीत - नागरिकांना कोणत्याही गरजेच्या वेळी मदतीला धावून येणारे म्हणून शिवसैनिकांची ओळख आहे. १९८९ पासून शिवसेना महापालिका, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा आदी निवडणूका धनुष्यबाण या चिन्हावर लढवत आली आहे. सध्या निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवले आहे. यामुळे भाजप आणि एकनाथ शिंदे गटाविरोधात सध्या मुंबईकर, राज्यातील जनतेमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आहे. ही चीड येत्या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाला फायदा करून देणार आहे. यामुळे सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे शिंदे गटात, भाजपात प्रवेश करू इच्छिणारे माजी नगरसेवक सध्या तरी प्रवेश करू कि करू नये अशा द्विधा मनस्थितीत सापडले आहेत अशी प्रतिक्रिया मुंबई महानगरपालिकेतील जेष्ठ पत्रकार सुनील शिंदे यांनी दिली.
पालिकेतील पक्षीय बळ -
शिवसेना | भाजपा | काँग्रेस | राष्ट्रवादी | समाजवादी पक्ष | एमआयएम | मनसे |
97 | 82 | 29 | 9 | 6 | 2 | 1 |