ETV Bharat / city

#coronavirus : राज्यात लॉकडाऊनच्या काळात क्वारंटाईनचे नियम मोडणाऱ्या 519 जणांवर कारवाई - महाराष्ट्र पोलीस

लॉकडाऊनच्या काळात राज्यभरात पोलिसांवर हल्ला होण्याच्या 76 घटना घडल्या आहेत. या गुन्ह्यात 162 आरोपींना अटक करण्यात आली आहे. कोरोना व्हायरसच्या संक्रमणाचा फटका मुंबई पोलीस खात्याला देखील बसला असून तब्बल 5 पोलीस अधिकारी आणि 14 पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनाची लागण झाली आहे.

maharashtra police
महाराष्ट्र पोलीस
author img

By

Published : Apr 14, 2020, 6:23 PM IST

मुंबई - राज्यात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे यावर उपाययोजना म्हणून केंद्र आणि राज्य सरकारकडून लॉकडाऊनचा कालवधी 3 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. मात्र, 22 मार्च ते 14 एप्रिल या लॉकडाऊनच्या काळात संपूर्ण राज्यात सुमारे 42,429 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. यात क्वारंटाईनच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 519 जणांवर राज्यभरात कारवाई करण्यात आली आहे.

लॉकडाऊनच्या काळात राज्यभरात पोलिसांवर हल्ला होण्याच्या 76 घटना घडल्या आहेत. या गुन्ह्यात 162 आरोपींना अटक करण्यात आली आहे. कोरोना व्हायरसच्या संक्रमणाचा फटका मुंबई पोलीस खात्याला देखील बसला असून तब्बल 5 पोलीस अधिकारी आणि 14 पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनाची लागण झाली आहे.

हेही वाचा... देशात आवश्यक वस्तूंचा पुरेसा साठा, काळजीची गरज नाही; लॉकडाऊन वाढवल्यानंतर शाहांची प्रतिक्रिया..

लॉकडाऊनच्या काळात कोविड-19 च्या संदर्भात 67,688 फोन कॉल 100 क्रमांकाच्या नियंत्रण कक्षावर आले. अनधिकृत वाहतुकीचे 993 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अनधिकृत वाहतूक प्रकरणी 8,562 जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच तब्बल 27,350 वाहन जप्त करण्यात आली आहेत. पोलिसांनी या काळात 1 कोटी 53 लाख 30 हजारांचा दंड थोटावला आहे. राज्यात कलम 144 व 188 नुसार पुणे शहरातून सर्वाधिक 5,278 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड 3498, नागपूर 2796, नाशिक शहर 2723 , सोलापूर 3204 गुन्हे नोंदवण्यात आले असून सर्वाधिक कमी गुन्हे रत्नागिरी 50 तर अकोला येथे 51 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.