ETV Bharat / city

Corona In Mumbai : मुंबईकरांनो काळजी घ्या! कोरोना वाढतोय, पालिका अलर्टवर - मुंबई कोरोना रुग्णांची वाढ

कोरोनाचे रुग्ण (Corona Cases in Mumbai) वाढत असताना ओमायक्रॉन व्हेरिएंटचे रुग्णही समोर येत आहेत. रुग्णसंख्या वाढत असल्याने पालिका आणि आरोग्य विभाग अलर्ट झाला असून रुग्णसंख्या वाढू नये, यासाठी सज्ज झाला आहे. मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यात पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून आतापर्यंत कोरोनाच्या दोन लाटा येऊन गेल्या. या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे.

Coronavirus covid cases rise again in maharashtra
Corona In Mumbai : मुंबईकरांनो काळजी घ्या! कोरोना वाढतोय, पालिका अलर्टवर
author img

By

Published : Dec 24, 2021, 11:30 AM IST

मुंबई - मुंबईत पुन्हा रुग्ण संख्या ( Covid Cases In Mumbai) वाढू लागली आहे. डिसेंबरच्या सुरुवातीला 100 ते 200 च्या सुमारास असलेली रुग्णसंख्या 19 डिसेंबरला 300 च्या पुढे गेली आहे. तर 22 डिसेंबरला 490 रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाचे रुग्ण वाढत असताना ओमायक्रॉन व्हेरिएंटचे रुग्णही समोर येत आहेत. रुग्णसंख्या वाढत असल्याने पालिका आणि आरोग्य विभाग अलर्ट झाला असून रुग्णसंख्या वाढू नये, यासाठी सज्ज झाला आहे.

रुग्णसंख्या पुन्हा वाढतेय -

मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यात पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून आतापर्यंत कोरोनाच्या दोन लाटा येऊन गेल्या. या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. मुंबईत पहिली लाट गेल्या वर्षी मार्च महिन्यात तर दुसरी लाट यावर्षी फेब्रुवारीनंतर आली. दुसऱ्या लाटे दरम्यान एप्रिल महिन्यात दिवसाला 11 हजार रुग्ण आढळून आले आहेत. मात्र जूननंतर रुग्णसंख्या कमी होऊ लागली आहे. 1 डिसेंबरला सर्वात कमी म्हणजे 108 रुग्ण आढळून आले आहेत. मात्र त्यानंतर पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. गेल्या काही दिवसात रुग्णसंख्या 200 च्या वर गेली आहे. 15 डिसेंबरला 238, 16 डिसेंबरला 279, 17 डिसेंबर 295, 19 डिसेंबरला 336, 22 डिसेंबरला 490 रुग्ण आढळून आले आहेत.

7 लाख 68 हजार नागरिकांना कोरोना -

शहरात आतापर्यंत एकूण 7 लाख 68 हजार 148 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 7 लाख 46 हजार 784 रुग्ण बरे झाले आहेत. तर 16 हजार 366 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 2419 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी 1962 दिवस इतका आहे. मुंबईमधील 14 इमारती सील करण्यात आल्या आहेत. 15 डिसेंबर ते 21 डिसेंबर या कालावधीत कोरोना वाढीचा दर 0.03 टक्के इतका आहे. रुग्ण शोधण्यासाठी रोज सुमारे 40 ते 45 हजार चाचण्या करण्यात येत असून आतापर्यंत एकूण 1 कोटी 32 लाख 91 हजार 717 चाचण्या करण्यात आल्या आहेत.

22 डिसेंबरला 490 रुग्ण -

मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून मुंबईत कोरोनाचा प्रसार आहे. फेब्रुवारी महिन्यात दुसरी लाट आली. एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या 11 हजारावर गेली होती. जूनपासून त्यात घट होऊ लागली. 1 डिसेंबरला कोरोनाचे 108 नवे रुग्ण आढळून आले होते. 2 डिसेंबरला त्यात वाढ होऊन 228 रुग्ण आढळून आले. 4 डिसेंबरला पुन्हा वाढ होऊन 228, 5 डिसेंबरला 219, 8 डिसेंबरला 250, 9 डिसेंबरला 218, 11 डिसेंबरला 256, 14 डिसेंबरला 225, 15 डिसेंबरला 238, 16 डिसेंबरला 279, 17 डिसेंबर 295, 18 डिसेंबर 283 रुग्ण आढळून आले. मात्र, त्यात वाढ होऊन 19 डिसेंबरला 336, 21 डिसेंबरला 327, 22 डिसेंबरला 490 रुग्ण आढळून आले आहेत.

सहा वेळा शून्य मृत्यूची नोंद -

मुंबईमध्ये गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. मुंबईमध्ये आलेल्या कोरोना विषाणूच्या दोन लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. त्याच प्रमाणे मृत्यूंची संख्या कमी करण्यात यश आले आहे. दुसऱ्या लाटेनंतर गेल्या काही महिन्यात 1 ते 6 मृत्यूंची नोंद होत होती. 17 ऑक्टोंबर 2021 रोजी शून्य मृत्युची नोंद झालेली आहे. त्यानंतर 11 डिसेंबरला दुसऱ्यांदा, 15 डिसेंबरला तिसऱ्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली होती. त्यानंतर 18 डिसेंबरला चौथ्यांदा शुन्य रुग्णांची नोंद झाली होती. 20 डिसेंबरला पाचव्यांदा तर 22 डिसेंबरला सहाव्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. मृत्यूची संख्या शून्य होत असल्याने कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यात पालिकेला यश येत असल्याचे दिसत आहे.

पालिका अलर्टवर -

मुंबईमध्ये ख्रिसमस आणि 31 जानेवारी हे सण मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. यासाठी परदेशातून आणि देशभरातून लोक मुंबईत येतात. त्यामुळे कोरोनाचा प्रसार होऊन रुग्णसंख्या वाढण्याची भीती आहे. त्यासाठी पालिकेने रुग्णालयातील 13 हजार तर कोविड सेंटरमधील 17 हजार असे एकूण 30 हजार बेडस सज्ज ठेवले आहेत. विभागवार कोविड सेंटर सुरु केली जाणार आहेत. त्यात लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी 40 हजार तर झोपडपट्टीमधील रुग्णांसाठी 30 हजार असे एकूण 70 हजार बेडस सज्ज ठेवले जाणार आहेत. लागणारी औषधे आणि ऑक्सिजनचा साठा असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. रुग्ण समोर येऊन त्यांच्यावर वेळीच उपचार करता यावेत. म्हणून चाचण्यांची संख्या वाढवण्यात आल्याचे काकाणी यांनी संगितले.

ओमायक्रॉन रुग्णांचा आकडा 31 वर -

मुंबई विमानतळावर अति जोखमीच्या देशातून 10,394 प्रवासी आले. त्यापैकी 37 प्रवासी विमानतळावरच्या चाचणीत कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. 1 नोव्हेंबर पासून परदेश प्रवास केलेल्या प्रवाशांचे सर्वेक्षण केले जात आहे. त्यात 65 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. कोरोना बाधितांच्या अतिजोखमीचे सहवासातील 15 रुग्ण पॉजिटिव्ह आढळून आले आहेत. कोरोना पॉझिटिव्ह प्रवाशांचे नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही, पुणे) येथे जीनोम सिक्वेंसिंग चाचणीसाठी पाठविण्यात आले. त्यात आतापर्यंत 31 जणांना ओमायक्रॉन कोविड विषाणू प्रकाराची बाधा झाल्याचा अहवाल महानगरपालिका प्रशासनाला प्राप्त झाला आहे.

मुंबईत कोरोनाच्या या 8 व्हेरिएंटचे रुग्ण -

आतापर्यंत कोरोना, डेल्टा आणि ओमायक्रॉन या विषाणूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आहेत. या तीन व्हेरिएंट व्यतिरिक्त मुंबईमध्ये कोरोनाच्या अल्फा, केपा, नाईन्टीन-ए, द्वेन्टी-ए, डेल्टा डेरिव्हेटीव्ह या 5 व्हेरियंटचे रुग्णही आढळून आले आहेत अशी माहिती पालिकेने केलेल्या जीनोम सिक्वेन्सिंग चाचण्यांमधून समोर आली आहे. मात्र, या 5 व्हेरिएंटचा मुंबईत प्रसार झाला नसल्याने त्यांची नावे चर्चेत आलेली नाहीत.

हेही वाचा - Mohammed Rafi B’day Special : दिवाना हुआ बादल...रफींच्या वाढदिवसानिमित्त ईटीव्ही भारतचा स्पेशल रिपोर्ताज..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.