मुंबई - आज राम नवमी. मर्यादापुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांची आज जन्मतिथी. परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सध्या मुंबईत आणि राज्यभरात कडक निर्बंध लावलेले आहेत. त्यामुळे राज्यातील मंदिरे तसेच अन्य प्रार्थनास्थळेही बंद ठेवण्यात आलेले आहेत. कडक निर्बंधांमुळे रामभक्त लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करत आहेत.
भक्तांच्या आनंदावर विरजण
लॉकडाऊनमुळे भक्तांच्या आनंदावर राम नवमीच्या दिवशी विरजण पडले आहे. सलग दुसऱ्या वर्षी राम नवमीच्या उत्सवात कोरोनाने बाधा निर्माण केली आहे. पण कडक निर्बंधांमुळे रामभक्त लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करत आहेत. तसेच घरच्या घरीच गर्दी न करता राम नवमीचा उत्सव साजरा करताना दिसत आहेत. मुंबईतील प्रसिद्ध वडाळा परिसरातील राम मंदिर हे प्रति अयोध्या म्हणून आोळखले जाते. मुंबईतून तसेच राज्यातून राम नवमीच्या उत्सवात येथे भक्त आवर्जून रामाचे दर्शन घेण्यास गर्दी करतात. परंतु, सध्या सरकारने लावलेल्या निर्बंधांमुळे मंदिर परिसरात फक्त सुरक्षा रक्षक व एक-दोन भक्तच बंद दरवाजाच्या बाहेरुनच रामाचे दर्शन घेताना पाहायला मिळाले.
हेही वाचा - नाशिक येथील दुर्घटनेने महाराष्ट्र शोकमग्न, घटनेची उच्चस्तरीय चौकशी होईल - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे