ETV Bharat / city

स्वातंत्र्य दिनानिमित्त मुलुंडमध्ये कोरोना योद्ध्यांकडून ध्वजारोहण

मागील 4 महिने कोरोना युद्धात दिवस रात्र सेवा देणारे डॉक्टर, परिचारिका, पोलीस, सफाई कामगार यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा आज मध्यरात्री 12 वाजता पार पडला.

corona-worriers-hosted-flag-in-mulund-on-the-occasionof-independence-day
स्वातंत्र्य दिनानिमित्त मुलुंडमध्ये कोरोना योद्ध्यांकडून ध्वजारोहण
author img

By

Published : Aug 15, 2020, 6:50 AM IST

मुंबई - भारताच्या 74 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुलुंड पश्चिमेकडील मेहुल सर्कलजवळ अनोख्या पद्धतीने ध्वजारोहणाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. मागील 4 महिने कोरोना युद्धात दिवस रात्र सेवा देणारे डॉक्टर, परिचारिका, पोलीस, सफाई कामगार यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा आज मध्यरात्री 12 वाजता पार पडला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभागप्रमुख राजेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या क्रार्यक्रमाचे आयोजन केले होते.

दरवर्षी 15 ऑगस्टला वेगवेगळ्या कलाकृती साकारण्यासाठी मेहुल सर्कलजवळील ध्वजारोहणाचा कार्यक्रम प्रसिद्ध आहे. यावर्षी कोरोनाच्या पाश्वभूमीवर अत्यंत साध्या पद्धतीने सोशल डिस्टंन्स ठेवून ध्वजारोहण करण्यात आले. पोलीस अधिकारी मुश्ताक खान, डॉ. एस. चंद्रशेखर, परिचारिका शिला गडवे, सफाई कामगार चितल आशया, चिटेला लिंगपा, वॉर्ड बॉय अर्जुन यांनी ध्वजारोहण केले. याठिकाणी अमर जवान स्मारक देखील उभारण्यात आले होते.

मुलुंड विभागात दरवर्षी स्वातंत्र्य ज्योतीची फेरी काढण्यात येते. कारगील, वाघा बॉर्डर याची प्रतिकृती या आधीच्या स्वातंत्र्यदिनी तयार करण्यात आली होती. यंदा उपस्थित लोकांमध्ये जोश कायम होता. मात्र, सोशल डिस्टंन्स ठेवून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

स्वातंत्र्य दिनानिमित्त मुलुंडमध्ये कोरोना योद्ध्यांकडून ध्वजारोहण
दरवर्षी 15 ऑगस्ट निमित्त आम्ही भव्य देखावा आम्ही उभारतो. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने हा दिन साजरा करण्याचे ठरविले. यावेळी आम्ही ध्वजारोहणासाठी कोरोना योद्धाना बोलविले होते. गेले चार महिने ते कोरोनाशी लढत आहेत. त्यांच्या सन्मान देखील यावेळी आम्ही केला, असे आयोजक राजेश चव्हाण म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.