ETV Bharat / city

'आम्ही मुंबईकरांचे कुटुंब सांभाळले, आता आमचे तुम्ही सांभाळा'; कोरोना योद्ध्यांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन - कोरोना योध्यांना कामावरून कमी केले

मुंबईमध्ये मार्चपासून कोरोनाचा प्रभाव वाढत असताना राज्य सरकारच्या सूचनेनुसार मुंबई महापालिकेने जम्बो कोरोना सेंटर उभारली. कोरोना योद्ध्यांनी रुग्णांना औषध देणे, रुग्णांना उचलणे, रुग्णांच्या संपर्कात आलेल्या हाय रिक्स लोकांना त्यांच्या घरातून उचलून कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी भरती करणे, आदी कामे केली. मात्र, आता रुग्ण संख्या कमी झाल्याने त्यांना कामावरून काढून टाकण्यात येत आहे.

कोरोना योध्ये
कोरोना योध्ये
author img

By

Published : Dec 18, 2020, 4:55 PM IST

मुंबई - कोरोना काळात रुग्णांवर उपचार करण्यासाठी कोविड सेंटर उभारण्यात आली. मुख्यमंत्री आणि महापालिकेच्या आवाहनाला साद देत, कोविड सेंटरमध्ये काम करण्यासाठी कोरोना योध्ये पुढे आले. आज त्याच कोरोना योद्ध्यांना कामावरून काढण्यात आले आहे. तर अनेकांना कामावरून काढण्याच्या नोटीस देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनांप्रमाणे मुंबईकर कुटुंबाची जबाबदारी आम्ही उचलली. आज आम्हाला कामावरून काढले जात असल्याने आता आमच्या कुटुंबाची जबाबदारी मुख्यमंत्री आणि मुंबई महापालिकेने उचलावी, असे आवाहन कोरोना योद्ध्यांनी केले आहे.

कोरोना योद्ध्यांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन

मुंबईमध्ये मार्चपासून कोरोनाचा प्रभाव वाढत असताना राज्य सरकारच्या सूचनेनुसार मुंबई महापालिकेने जम्बो कोरोना सेंटर उभारली. या कोविड सेंटरमध्ये काम करण्यास डॉक्टर कर्मचाऱ्यांची कमतरता भासत असल्याने मुख्यमंत्री, मुंबई महापालिकेने कोरोना योद्ध्यांनी पुढे येऊन रुग्णांची सेवा करावी, असे आवाहन केले. या आवाहनानुसार हजारो लोक कोरोना सेंटरमध्ये काम करण्यासाठी पुढे आले. या कोरोना योद्ध्यांनी रुग्णांना औषध देणे, रुग्णांना उचलणे, रुग्णांच्या संपर्कात आलेल्या हाय रिक्स लोकांना त्यांच्या घरातून उचलून कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी भरती करणे, आदी कामे केली.

कोरोना योद्ध्यांच्या व्यथा -

रुग्णाची सेवा करताना त्यांनाही कोरोनाची लागण झाली. पगार वेळेत मिळत नसतानाही त्यांनी काम केले. मात्र, रुग्ण संख्या कमी झाल्याने कोरोना योद्ध्यांना कामावरून काढले जात आहे. आमच्या संपर्कात असलेल्या एक हजार कर्मचाऱ्यांपैकी दिडशेहून अधिक लोकांना कामावरून काढण्यात आले आहे. अनेकांना कामावर येऊ नका अशा नोटीस देण्यात आल्या आहेत, अशी माहिती प्रमोद काटे यांनी दिली.

आरोग्य मंत्र्यांची भेट -

आम्हाला कामावरून काढून टाकले जात असल्याने आम्ही आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेतली आहे. मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचीही भेट घेतली. त्यांनी आम्हाला पालिकेच्या कामात सामावून घेवू, असे तोंडी आश्वासन दिले आहे. तरीही आम्हाला नोकरीवरून काढण्याच्या नोटिसा येतच आहेत. आमची नोकरी गेली, तर आमच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे, असे काटे म्हणाले.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची घेतली भेट
कोरोना योद्ध्यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची घेतली भेट

मुख्यमंत्र्यांनी आमचे कुटूंब सांभाळावे -

मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनानुसार आम्ही कोरोनाच्या महामारीत कुटुंबाच्या जीवाची पर्वा न करता काम केले. आम्हाला पगारही वेळेवर मिळत नाही. मुख्यमंत्र्यांनी माझे कुटूंब माझी जबाबदारी उपक्रम राबवला. आम्हीही त्यात सहभागी झालो. आम्ही मुंबईकर आणि राज्यातील कुटूंबाची जबाबदारी घेतली. कोरोना रुग्णांची सेवा केली. आज आमच्या नोकऱ्या राहणार नसल्याने आमच्या कुटूंबाची जबाबदारी मुख्यत्र्यांनी घ्यावी, असे आवाहन कोरोना योद्ध्यांनी केले आहे.

हेही वाचा - दिल्लीतील शेतकरी आंदोलन डाव्यांकडून पुरस्कृत; दानवेंनंतर गोव्यातील भाजप नेत्याची टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.