मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट तसेच रुग्णसंख्या आटोक्यात आहे. गेल्या महिन्यात रोज 2 ते 3 हजारादरम्यान रुग्ण आढळून येत आहेत. आज (मंगळवार) 1,638 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच आज मृत्यूंची संख्या किंचित वाढली असून 49 मृत्यूंची नोंद झाली असून 2 हजार 791 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.42 टक्के तर मृत्यूदर 2.12 टक्के इतका आहे.
26,805 सक्रिय रुग्ण -
आज राज्यात 1638 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 65 लाख 94 हजार 820 वर पोहोचला आहे. तर आज 49 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 1 लाख 39 हजार 865 वर पोहचला आहे. आज 2 हजार 791 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 64 लाख 24 हजार 547 वर पोहचला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 97.42 टक्के तर मृत्यूदर 2.12 टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 12 लाख 48 हजार 820 नमुन्यांपैकी 65 लाख 94 हजार 820 नमुने म्हणजेच 10.77 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 2 लाख 9 हजार 798 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून 26 हजार 805 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
हे ही वाचा - शिल्पा शेट्टी व राज कुंद्रा यांचा अभिनेत्री शर्लिन चोप्रा विरुद्ध 50 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा
रुग्ण, मृत्यूसंख्येत चढउतार -
1 ऑक्टोबरला 3105, 4 ऑक्टोबरला 2026, 11 ऑक्टोबरला 1736, 14 ऑक्टोबरला 2384, 15 ऑक्टोबरला 2149, 16 ऑक्टोबरला 1553, 17 ऑक्टोबरला 1715, 18 ऑक्टोबरला 1485, 19 ऑक्टोबरला 1638 रुग्ण आढळून आले आहेत. तर 28 जुलैला 286, 4 ऑक्टोबरला 26, 5 ऑक्टोबरला 39, 6 ऑक्टोबरला 90, 10 ऑक्टोबरला 28, 11 ऑक्टोबरला 36, 12 ऑक्टोबरला 43, 13 ऑक्टोबरला 49, 14 ऑक्टोबरला 35, 15 ऑक्टोबरला 29, 16 ऑक्टोबरला 26, 17 ऑक्टोबरला 29, 18 ऑक्टोबरला 27, 19 ऑक्टोबरला 49 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात रुग्ण आणि मृत्यू संख्येत चढउतार पाहायला मिळत आहे.
या विभागात सर्वाधिक रुग्ण -
मुंबई महापालिका - 394
अहमदनगर - 235
पुणे - 180
पुणे पालिका - 123