ETV Bharat / city

'इमारतीमधील नागरिकांच्या बेशिस्तपणामुळे मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ' - Mumbai Commissioner Iqbal Singh Chahal

उंच इमारतीमधील नागरिकांच्या बेशिस्तपणामुळे मुंबईमधील कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी म्हटले आहे. इमारतीमधील नागरिकांनी झोपडपट्टीतील नागरिकांकडून शिकण्याची गरज असल्याचे मत आयुक्तांनी व्यक्त केले आहे.

corona spread in mumbai from undisciplined citizens who living in building
मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल
author img

By

Published : Aug 3, 2020, 3:10 AM IST

मुंबई - शहर आणि परिसरात कोरोनाचा प्रसार होत असताना त्याला रोखण्यासाठी झोपडपट्टीतील नागरिक नियमांचे पालन करत होते. त्याच वेळी उंच इमारतीमधील नागरिक नियमांचे उल्लंघन करत होते. उंच इमारतीमधील नागरिकांच्या बेशिस्तपणामुळे मुंबईमधील कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी म्हटले आहे. इमारतीमधील नागरिकांनी झोपडपट्टीतील नागरिकांकडून शिकण्याची गरज असल्याचे मत आयुक्तांनी व्यक्त केले आहे.

मुंबईमध्ये मार्च महिन्यापासून कोरोनाची लागण होण्यास सुरुवात झाली. मे महिन्यात मी पालिका आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला तेव्हा झोपडपट्टीत कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला होता. त्याला रोखण्याचे मोठे आव्हान होते. मात्र झोपडपट्टीमधील नागरिकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी आपले दरवाजे उघडून स्वागत केले. त्यांनी नियमांचे पालन केले त्यामुळे झोपडपट्टीतील कोरोनाचा प्रसार रोखता आल्याचे आयुक्तांनी सांगितले. यासाठी मी झोपडपट्टीमधील नागरिकांचे अभिनंदन करतो, असे आयुक्त म्हणाले.

हेही वाचा - जगभरात 6 लाख 88 हजार 962 कोरोना रुग्णांचा मृत्यू

मुंबईमध्ये सध्या दररोज 1,100 च्या दरम्यान रुग्ण आढळून येत आहेत. त्यापैकी 80 टक्के रुग्ण उंच इमारतीमधील आहेत. उंच इमारतीमधील नागरिक बेशिस्तपणे वागत असल्याने कोरोनाचा रुग्ण जास्त प्रमाणात इमारतींमधून आढळून येत आहेत. इमारतीमधील नागरिकांनी झोपडपट्टीतील नागरिकांकडून काही शिकावे, असा सल्ला आयुक्तांनी दिला आहे. कमित कमी आपल्या कुटूंबासाठी इमारतीमधील नागरिकांनी घराबाहेर पडू नये, मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टनसिंगचे पालन करावे, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

...तर मुंबई पुन्हा धावणार

मुंबईची लोकसंख्या 2 कोटीच्या जवळपास आहे. सध्या रोज 1100 च्या दरम्यान रुग्ण आढळून येत आहेत. त्यानुसार आम्ही मुंबईचे जनजीवन पुन्हा सुरू करू शकतो. मात्र मुंबईला लागून असलेल्या महापालिका आणि जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आहेत. रेल्वे सुरू केल्यास प्रवाशांच्या गर्दीमुळे कोरोनाचा प्रसार होऊ शकतो. त्यासाठी मुंबई लगतच्या पालिका आणि जिल्ह्यातील रुग्ण संख्या कमी झाल्यावर मुंबईमधील सर्व व्यवहार सुरळीत सुरू केले जातील, असे आयुक्तांनी सांगितले.

रुग्णांच्या संख्येत घट...

30 जूनला मुंबईत 76 हजार रुग्ण होते. जुलैच्या अखेरीस 1 लाख 10 हजार रुग्ण आहेत. रोज 1100 नवे रुग्ण आढळून येत आहेत. त्याप्रमाणे 28 हजार ऍक्टिव्ह रुग्ण असायला हवे होते. मात्र सध्या 20 हजार ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. मागील महिन्यात एका रुग्णाच्या माध्यमातून 1.5 टक्के लोकांना कोरोनाची लागण होत होती. त्याचे प्रमाण आता 0.97 टक्के आहे. 1 जुलैला 3600 ते 3700 टेस्ट केल्या जात होत्या त्यावेळी 1100 ते 1200 रुग्ण आढळून येत होते. 30 जुलैला टेस्ट करण्याची क्षमता तीन पटीने वाढवत 11 हजारावर नेली असताना 1100 ते 700 नवे रुग्ण आढळून येत असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

हेही वाचा - आसाममध्ये कोरोना रुग्णांचा आकडा 41 हजार 726 वर

मृत्यू दर कमी केला...

11 ते 15 जून दरम्यान मार्च ते मे दरम्यान नोंद न झालेल्या 862 मृत्यूंची नोंद झाल्याने 16 जूनला मृत्यू दर 2.9 वरून 7 वर गेला. 29 जुलैला तो 5.6 टक्क्यांवर आला आहे. मुंबई महापालिका मृत्यूचे आकडे लपवत नसल्याने मृत्यू दर मोठा असल्याचे वॉशिंग्टन पोस्टनेही म्हटले आहे. मृत्यू दार कमी करण्यासाठी आरोग्य विभागाला सूचना देण्यात आल्याचे आयुक्तांनी सांगितले.

दुसऱ्या फेजसाठी पालिका तयार...

मार्च महिन्यात कोरोनाचा प्रसार शिरू झाला तेव्हा पालिकेकडे रुग्णालयात 3700 व आयसीयूच्या 271 खाटा होत्या. आज पालिकेकडे हॉस्पिटलमध्ये 23 हजार खाटा तर 1700 हुन अधीक आयसीयू बेड आहेत. मुंबईत कोरोनाची दुसऱ्यांदा लाट आली तर त्याचा मुकाबला करण्यासाठी पालिका रुग्णालय, कर्मचारी आणि डॉक्टर सज्ज असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.