ETV Bharat / city

राज्यात 14 हजार 883 कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा डोस - Corona preventive vaccination latest news

राज्यात आज 274 केंद्रांवर आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करण्यात आले. सायंकाळी सातपर्यंत 14 हजार 883 (52.68 टक्के) कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली.

Corona preventive vaccination
कोरोना प्रतिबंधात्मक लस
author img

By

Published : Jan 19, 2021, 9:38 PM IST

मुंबई - राज्यात आज 274 केंद्रांवर आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करण्यात आले. सायंकाळी सातपर्यंत 14 हजार 883 (52.68 टक्के) कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. काही ठिकाणी सायंकाळी उशिरापर्यंत लसीकरण सुरु होते. लस घेतल्यानंतर गंभीर प्रतिकुल परिणाम झाल्याची घटना झाली नसून, उद्या देखील लसीकरण सत्र आयोजित करण्यात आल्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

असे झाले लसीकरण -

राज्यात शनिवारी 34 जिल्हे आणि 27 महापालिका क्षेत्रामध्ये लसीकरणाचे सत्र सुरु झाले असून कोविन पोर्टलवर 17 हजार 762 व्हॅक्सीनेटर्स आणि 7 लाख 85 हजार 927 आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंद करण्यात आली आहे. आज सकाळी नऊ वाजेपासून लसीकरणाला सुरुवात झाली. सायंकाळी ७ वाजेपर्यंत अकोला (181), अमरावती (239), बुलढाणा (359), वाशीम (212), यवतमाळ (289), औरंगाबाद (335), हिंगोली (120), जालना (231), परभणी (229), कोल्हापूर (545), रत्नागिरी (245), सांगली (432), सिंधुदूर्ग (161), बीड (142), लातूर (221), नांदेड (276), उस्मानाबाद (238), मुंबई (595), मुंबई उपनगर (1002), भंडारा (206), चंद्रपूर (399), गडचिरोली (187), गोंदिया (144), नागपूर (656), वर्धा (386 टक्के), अहमदनगर (650), धुळे (313), जळगाव (397), नंदुरबार (285), नाशिक (710), पुणे (1403), सातारा (511), सोलापूर (681), पालघर (319), ठाणे (1434), रायगड (150) इतके लसीकरण करण्यात आले.

हेही वाचा - राज्यात २ हजार २९४ नवीन कोरोना रुग्णांची वाढ; ५० रुग्णांचा मृत्यू, रिकव्हरी रेट 95 टक्क्यांवर

हेही वाचा -प्रजासत्ताक दिनी नव्या ग्रामसभा होणार नाहीत, लवकरच सरपंचाची सोडत काढणार- हसन मुश्रीफ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.