ETV Bharat / city

मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत वाढ सुरूच, 736 नवे रुग्ण, 4 मृत्यू - mumbai corona news

मुंबईत मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. गेल्या अकरा महिन्यात करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे कोरोना आटोक्यात आला होता.

मुंबईत कोरोना अपडेट
मुंबईत कोरोना अपडेट
author img

By

Published : Feb 18, 2021, 9:21 PM IST

मुंबई - मुंबईत मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. गेल्या अकरा महिन्यात करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे कोरोना आटोक्यात आला होता. मुंबईत 300 ते 400 रुग्ण आढळून येत होते. मात्र एक महिन्यानंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. 14 फेब्रुवारीला 645, 15 फेब्रुवारीला 493, 16 फेब्रुवारीला 461, 17 फेब्रुवारीला 721 तर आज 736 नवे रुग्ण आढळून आले आहेत. रुग्ण संख्या वाढल्याने मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

कोरोना रुग्णांची आकडेवारी -

मुंबईत आज 736 रुग्ण आढळून आल्याने कोरोनाग्रस्तांचा आकडा 3 लाख 16 हजार 478 वर पोहचला आहे. आज 4 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 11 हजार 430 वर पोहचला आहे. 473 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 2 लाख 97 हजार 995 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 6201 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 417 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 57 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 258 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत 30 लाख 80 हजार 528 चाचण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

हे विभाग हॉटस्पॉट -

मुंबईत बोरिवली, अंधेरी पूर्व, जोगेश्वरी, मुलुंड, चेंबूर, टिळक नगर आदी विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे. या विभागात कोरोनाचे नियम पाळावेत म्हणून सोसायट्यांना पालिकेने नोटीस बजावल्या आहेत.

रुग्णसंख्या वाढली होती -

मुंबईत 6 जानेवारीला 795, 7 जानेवारीला 665, 8 जानेवारीला 654, 10 जानेवारीला 656 कोरोना रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर रोज 300 ते 500 दरम्यान रुग्ण आढळून येत होते. 14 फेब्रुवारीला 645, 15 फेब्रुवारीला 493, काल 16 फेब्रुवारीला 461, 17 फेब्रुवारीला 721 तर आज 736 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

या दिवशी कमी रुग्णांची नोंद -

मुंबईत मार्च पासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. मुंबईत 7 नोव्हेंबरला 576, 10 नोव्हेंबरला 535, 16 नोव्हेंबरला 409, 18 जानेवारीला 395, 24 जानेवारीला 348, 26 जानेवारीला 342, 1 फेब्रुवारीला 328 म्हणजेच सर्वात कमी रुग्ण आढळून आले आहेत.

हेही वाचा- कोरोना रुग्णवाढ : 'या' जिल्ह्यांमध्ये प्रतिबंधित क्षेत्रे जाहीर करण्याच्या सूचना

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.