नागपूर - नागपूर शहरात आणि जिल्ह्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे एकूण सक्रिय रुग्णांची संख्या दीडशेच्या आत आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने पुन्हा नागरिकांमध्ये बेजबाबदारपणा वाढला आहे. अशातच आता नागपूरच्या लक्ष्मीनगर परिसरातील एकाच कुटुंबातील सहा सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाल्यामुळे नागपूरकरांची चिंता वाढली आहे. आरोग्य विभागाने सर्व सहा कोरोनाबाधित सदस्यांना विलगीकरण कक्षात ठेवले आहे. सहाही रुग्ण डेल्टा प्लस या नवीन कोरोना व्हेरियंटचे संशयित असल्याने त्यांचे स्वॅब तपासणीसाठी हैदराबाद येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.
#MahaCorona LIVE : राज्यातील कोरोना परिस्थितीचे अपडेट्स फक्त एका क्लिकवर..
17:46 July 07
नागपूर : एकाच कुटुंबातील सहा जणांना कोरोनाची लागण; डेल्टा प्लस संशयित असल्याने नमुने हैदराबादला पाठवले
12:45 July 07
नागपुरात आढळले सहा नवे रुग्ण; डेल्टा प्लसची लागण झाल्याचा संशय
नागपूरच्या लक्ष्मी नगर भागात राहणाऱ्या एकाच कुटुंबातील 6 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. हे सर्व रुग्ण डेल्टा प्लसचे संशयित असल्याने, त्यांचे नमुने हैदराबाद येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. हे सर्व पुण्याहून प्रवास करुन आले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नागपूरकरांची धाकधूक वाढली आहे.
06:13 July 07
मुंबई कोरोना अपडेट : दुसऱ्या लाटेतील सर्वात कमी रुग्णांची नोंद, 453 नवे रुग्ण
मुंबई - मुंबईत फेब्रुवारीपासून कोरोनाची दुसरी लाट आली. दुसऱ्या लाटेदरम्यान रुग्णांची संख्या वाढली होती. एप्रिल महिन्यात रोज 7 ते 11 हजाराच्यावर रुग्ण आढळून येत होते, त्यात गेल्या महिनाभरात घट झाली आहे. मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी पाचशेच्या खाली रुग्णांची नोंद झाली. सोमवारी 489, तर मंगळवारी नव्या 453 रुग्णांची नोंद झाली आहे. फेब्रुवारीपासून सर्वात कमी रुग्णांची मंगळवारी नोंद झाली, तर 10 मृत्यूची नोंद झाली आहे. 482 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईमधील कोरोनाचा प्रसार कमी होत असल्याने रुग्ण दुपटीचा कालावधी वाढून 822 दिवसांवर पोहचला आहे.