मुंबई - कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांना बुरशीजन्य म्हणजेच म्युकरमायकोसिस हा आजार झाल्याचे सामोर आले आहे. 25 मे पासून आतापर्यंत या आजाराचे 8920 रुग्ण आढळून आले असून त्यापैकी तब्बल 1014 जणांचा मृत्यू झाला आहे. यामधील सर्वाधिक मृत्यू हे पुणे, मुंबई आणि नागपूर येथे नोंदविण्यात आले आहेत अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
#MahaCorona LIVE : राज्यातील कोरोना परिस्थितीचे अपडेट्स फक्त एका क्लिकवर.. - state corona update
10:54 July 06
राज्यात म्युकरमायकोसिसचे 8920 रुग्ण, 1014 जणांचा मृत्यू
09:25 July 06
देशात रुग्ण बरे होण्याचा दर 97.17 टक्के, 34 हजार बाधितांची नव्याने नोंद
नवी दिल्ली - देशात गेल्या 24 तासांत 34,703 नवे रुग्ण आढळले आहेत. गेल्या 111 दिवसांत सोमवारी सर्वात कमी रुग्णसंख्येची नोंद करण्यात आली आहे. देशात सध्या 4,64,357 सक्रिय रुग्ण असून रुग्ण बरे होण्याचा दर 97.17% टक्क्यांवर आहे.
09:23 July 06
नाशकात 277 रुग्ण झाले बरे, 124 नव्या बाधितांची नोंद
नाशिक - जिल्ह्यात सोमवारी 277 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर, 124 रुग्णांची नव्याने नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 8385 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
09:22 July 06
मुंबईत कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमिवर पालिका प्रशासन सज्ज
मुंबई - मुंबईत कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पालिका सज्ज झाली आहे. मुंबईतील हायरिस्क विभागात खबरदारी घेतली जात असून नवीन आढळणा-या रुग्णांकडे गांभीर्याने लक्ष्य दिले जात आहे. प्रत्येक हाय रिक्स प्रभागातील एका रुग्णाच्या मागे याआधी २० जणांची चाचणी केली जात होती. आता ३२ जणांची तपासणी करण्याचे आदेश आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. ३ जुलैच्या आकडेवारीनुसार मुंबईत गेल्या २४ तासात ८ हजार ९३ कॉन्टॅक्टचा शोध घेण्यात आला. त्यामध्ये ५ हजार ७४० हायरिस्क कॉन्टॅक्ट होते. तर २ हजार ३५३ लो रिस्क कॉन्टॅक्ट होते. आतापर्यंत ७८ लाख ३९ हजार ७० कॉन्टॅक्टचा शोध घेण्यात आला. त्यात ४३ लाख ५१ हजार ३२६ हायरिस्क कॉन्टॅक्ट आहेत, तर ३४ लाख ८७ हजार ७४४ लो रिस्क कॉन्टॅक्ट आहेत.
06:06 July 06
वाशिम जिल्ह्यात लसीचा दुसरा डोस घेणारे केवळ 9 टक्के; डेल्टा प्लसचा धोका कसा रोखणार
वाशिम - कोविड लसीकरण मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील १३ लाख ५० हजार नागरिकांना कोविड प्रतिबंधक लस देण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागाने समोर ठेवले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आरोग्य विभागाने १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिम सुरू केली. जिल्ह्यात कोविड लसीकरण मोहिमेला सुरुवात होऊन सहा महिन्यांचा कालावधी लोटला आहे. मात्र जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ३ लाख ७ हजार २३९ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यापैकी २ लाख ६४ हजार ३५४ नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. म्हणजेच एकूण लक्ष्याच्या 30 टक्के नागरिकांनी लसींचा पहिला डोस घेतला आहे. तर केवळ ८० हजार ७२१ लोकांनी म्हणजेच केवळ 9 टक्के लोकांनी दुसरा डोस घेतला आहे.