मुंबई - मुंबईत फेब्रुवारीपासून कोरोनाची दुसरी लाट आली. दुसऱ्या लाटेदरम्यान रुग्णांची संख्या वाढली होती. एप्रिल महिन्यात रोज 7 ते 11 हजाराच्यावर रुग्ण आढळून येत होते, त्यात गेल्या महिनाभरात घट झाली आहे. मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी पाचशेच्या खाली रुग्णांची नोंद झाली आहे. काल (सोमवार) 489 तर आज (मंगळवार) नव्या 453 रुग्णांची नोंद झाली आहे. फेब्रुवारीपासून सर्वात कमी रुग्णांची आज नोंद झाली आहे. तर 10 मृत्यूची नोंद झाली आहे. 482 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईमधील कोरोनाचा प्रसार कमी होत असल्याने रुग्ण दुपटीचा कालावधी वाढून 822 दिवसांवर पोहचला आहे.
रुग्ण दुपटीचा कालावधी 453 दिवसांवर -
मुंबईत आज 453 नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 7 लाख 25 हजार 620 वर पोहचला आहे. आज 10 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 15 हजार 564 वर पोहचला आहे. आज 482 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 6 लाख 99 हजार 823 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 7 हजार 908 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 822 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 13 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 74 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आज 30 हजार 554 तर आतापर्यंत एकूण 73 लाख 53 हजार 737 चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
अशी होते आहे रुग्णसंख्या कमी -
1 मेला 3908, 9 मेला 2403, 10 मेला 1794, 17 मेला 1240, 25 मेला 1037, 28 मेला 929, 8 जूनला 673, 10 जूनला 660, 11 जूनला 696, 14 जूनला 529, 15 जूनला 575, 16 जूनला 830, 21 जूनला 521, 22 जूनला 570, 4 जुलैला 548, 5 जुलैला 489, 6 जुलैला 453 नवे रुग्ण आढळून आले आहेत.