मुंबई - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारी कार्यालयातील उपस्थिती पाच टक्क्यावर आणण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयानंतर आज (सोमवार) मंत्रालय आणि परिसरात एकदम शुकशुकाट झाल्याचे पहायला मिळत आहे.
हेही वाचा.... कोरोना लॉकडाऊन : उद्धव यांना बाळासाहेबांचा अवतार धारण करावा लागणार ?
मंत्रालयात आज केवळ पाच टक्केच अधिकारी-कर्मचाऱ्यांची उपस्थिती असल्याने अनेक कार्यालयांना टाळे लावण्यात आले आहे. तर ज्या ठिकाणी अधिकारी-कर्मचारी उपस्थित आहेत त्यांच्यासाठी मंत्रालयातील अधिकारी आणि इतर सर्वसामान्यांसाठी असलेली दोन्हीही उपाहारगृहे बंद असल्याने या उपस्थितांची देखील मोठी पंचायत होत आहे.
हेही वाचा... कोरोना इफेक्ट : 31 मार्चपर्यंत नाशकातील नोटा छपाई बंद...!
मंत्रालयाच्या मुख्य इमारतीत दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर सामान्य प्रशासन विभागाचे कार्यालय असून यातील दुसऱ्या मजल्यावर असलेल्या सामान्य प्रशासन विभागाचे कार्यालय बंद ठेवण्यात आले आहे. तर दुसरीकडे मुख्य सचिवांच्या दालनाच्या शेजारची कार्यालये देखील बंद ठेवण्यात आली आहेत. तर माहिती व जनसंपर्क विभागात मात्र मोठ्या संख्येने अधिकारी-कर्मचारी उपस्थित आहेत.
मंत्रालयाच्या मुख्य इमारतीमध्ये असलेले स्वयंचलीत एसकिलेटर (सरकता जिना) पूर्णपणे बंद ठेवण्यात आले असून केवळ काही लिफ्ट मात्र सुरू ठेवण्यात आल्या आहेत.