ETV Bharat / city

विशेष बातमी : 'अँटीबॉडीज', लसीकरणानंतरही होऊ शकतो कोरोना - सुरेश काकाणी - कोरोना

नुकत्याच करण्यात आलेल्या सेरो सर्व्हेमधून मुंबईमधील 86 टक्क्यांहून अधिक नागरिकांमध्ये अँटीबॉडीज निर्माण झाल्याचे समोर आले. यामुळे मुंबईमध्ये तिसरी लाट येणार नाही, असा समज करून घेऊ नये. पावसाळ्यादरम्यान तसेच गणेशोस्तवासाठी मुंबईबाहेर गेलेले नागरिक मुंबईत परतल्यावर त्यांच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार होऊ शकतो, अशी शक्यता पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.

f
f
author img

By

Published : Sep 18, 2021, 7:05 PM IST

मुंबई - नुकत्याच करण्यात आलेल्या सेरो सर्व्हेमधून मुंबईमधील 86 टक्क्यांहून अधिक नागरिकांमध्ये अँटीबॉडीज निर्माण झाल्याचे समोर आले. यामुळे मुंबईमध्ये तिसरी लाट येणार नाही, असा समज करून घेऊ नये. पावसाळ्यादरम्यान तसेच गणेशोस्तवासाठी मुंबईबाहेर गेलेले नागरिक मुंबईत परतल्यावर त्यांच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार होऊ शकतो. अँटीबॉडीज असलेल्या आणि लस घेतलेल्या नागरिकांना कोरोची लागण होऊन सौम्य लक्षणे येऊ शकतात, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.

मुंबई महापालिका काळजी घेत असून नागरिकांनी कोरोना नियमांची अंमलबजावणी करावी, असे आवाहन सुरेश काकाणी यांनी केले आहे. तर मुंबईकरांमध्ये अँटीबॉडीज तयार झाल्याने तिसऱ्या लाटेचा प्रसार मोठ्या प्रमाणात दिसणार नाही अशी माहिती मेडस्केप इंडियाच्या अध्यक्षा डॉ. सुनीता दुबे यांनी दिली.

तरीही होऊ शकतो कोरोना

मुंबईमध्ये गेले दीड वर्ष कोरोनाचा प्रसार आहे. हा प्रसार कमी झाला असून दुसरी लाट ओसरली आहे. मुंबईत सध्या 300 ते 400 रुग्ण रोज आढळून येत आहेत. मुंबईत करण्यात आलेल्या पाचव्या सेरो सर्व्हेमध्ये 86.64 टक्के नागरिकांमध्ये तसेच लसीकरण करण्यात आलेल्या 90.26 टक्के नागरिकांमध्ये अँटीबॉडीज निर्माण झाल्या आहेत. यामुळे मुंबईत तिसरी लाट आल्यास त्याचा काय परिणाम नागरिकांवर होऊ शकतो याबाबत काकाणी बोलत होते. यावेळी म्हणाले, पावसाळ्याच्या चार महिन्यात मुंबई आणि राज्याबाहेरील लोक आपल्या गावाकडे जातात. तसेच गणेशोत्सव असल्याने अनेक चाकरमानी कोकणात गेले आहेत. पावसाळा संपत असल्याने तसेच गणेशोत्सवानंतर हे सर्व नागरिक मुंबईत यायची सुरुवात होत आहे. हे नागरिक मुंबईत येताना कोरोनाचा प्रसार घेऊन येतात का यावर आमचे लक्ष आहे. मुंबई बाहेरून येणाऱ्या लोकांमुळे सध्या शहरात असलेल्या नागरिकांना कोरोनाची लागण होऊ शकते. अँटीबॉडीज असलेले किंवा लस घेतलेले नागरिक कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्यास त्यांना विषाणूची लागण होऊ शकते. अँटीबॉडीज असल्या किंवा लस घेतली असली तरी सौम्य लक्षणे येऊ शकतात. यामुळे नागरिकांनी मास्क लावणे, सुरक्षित अंतर राखणे, हात वारंवार स्वच्छ धुणे या नियमांचे पालन करावे, असे आवाहन काकाणी यांनी केले आहे.

लाटेचा प्रभाव दिसणार नाही

कोरोनाचे रूप सतत बदलत आहे. विषाणूच्या बदलत्या रुपामुळे कोरोनाची तिसरी लाट येईल. जगभरात अनेक देशात तिसरी लाट आली असून मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. भारतात सध्या रुग्णसंख्या कमी असल्याने तिसऱ्या लाटेचा परिणाम दिसून येत नाही. मुंबईकरांमध्ये अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत. लसीकरणही चांगल्या सुरु आहे. यामुळे कमी प्रमाणात रुग्ण आढळून येतील. रुग्णालयात उपचार घ्यावे लागतील अशा रुग्णांची संख्या कमी असेल. घरातच बरे होतील अशा रुग्णांची संख्या जास्त असेल. इतर आजार असलेल्या नागरिकांना कोरोनाची लागण झाली तर अशा नागरिकांनाच रुग्णालयांत उपचार घेण्याची गरज लागेल. दुसऱ्या लाटेदरम्यान राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेने बेड्स, ऑक्सिजनचे चांगल्या प्रकारे नियोजन केले होते. आताही ते सज्ज आहेत. यामुळे तिसऱ्या लाटेचा प्रभाव मोठ्या प्रमाणात दिसून येणार नाही, असे मेडस्केप इंडियाच्या अध्यक्षा डॉ. सुनीता दुबे यांनी म्हटले आहे.

पालकांनी घाबरू नये

भारतात 18 वर्षांवरील नागरिकाने कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक लस दिली जाते. त्या खालील लहान मुलांना लस दिली जात नाही. 12 वर्षांखालील लहान मुलांच्या घशात थायसम नावाचा द्रव असतो. त्यामुळे लहान मुलांमध्ये अँटीबायोटिक निर्माण होत असते. ताप, सर्दी, खोकला यावरचे औषध दिले तरीही ही लहान मुले लगेच बरी होतात. यामुळे पालकांनी घाबरू नये. पालकांनी मुलांची काळजी घ्यावी, असे डॉ. सुनीता दुबे यांनी सांगितले.

86.64 टक्के नागरिकांमध्ये अँटीबॉडीज

कोरोनाचा प्रसार किती नागरिकांमध्ये होऊन गेला आहे. ते शोधण्यासाठी सेरो सर्व्हेक्षण करण्यात येते. मुंबईत आतापर्यंत तीन वेळा सेरो सर्वेक्षण करण्यात आले. एक वेळा लहान मुलांचे सेरो सर्वेक्षण करण्यात आले. 12 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर, 2021 या कालावधीत महानगरपालिकेने पाचवे सेरो सर्वेक्षण राबवले. पाचव्या सर्वेक्षणानुसार एकूण 86.64 टक्के नागरिकांमध्ये अँटीबॉडीजचे अस्तित्व दिसून आले आहे. कोविड लसीकरण झालेल्या नागरिकांपैकी अँटीबॉडीज विकसित झालेल्यांची संख्या 90.26 टक्के तर लसीकरण न झालेल्यांपैकी 79.86 टक्के नागरिकांमध्ये अँटीबॉडीज आढळली आहेत. विशेष म्हणजे, मागील सर्वेक्षणांच्या तुलनेत झोपडपट्टी तसेच बिगर झोपडपट्टी परिसरांमध्येही अँटीबॉडीज विकसित होण्याचे प्रमाण वाढल्याचा निष्कर्षही यातून समोर आला आहे.

हेही वाचा - दहशतवाद्यांच्या रडारवर मुंबई लोकल, लोकलमध्ये विषारी गॅस सोडण्याचा होता कट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.