ETV Bharat / city

एसएनडीटी विद्यापीठात अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षाच्या परीक्षेचा घोळ! - sndt engineering exam news

उषा मित्तल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयामध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनीची नुकतीच ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात आली होती. मात्र, डिप्लोमा उत्तीर्ण होऊन अभियांत्रिकीच्या पदवी अभ्यासक्रमासाठी थेट द्वितीय वर्षाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनींची महाविद्यालयाकडून 9 एप्रिलपासून ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहे.

SNDT University
एसएनडीटी विद्यापीठ
author img

By

Published : Apr 6, 2022, 3:32 PM IST

मुंबई - एसएनडीटी विद्यापीठाच्या उषा मित्तल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयात अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली, तर काही विद्यार्थ्यांची नऊ एप्रिलपासून ऑफलाईन परीक्षा घेण्यात येणार असल्याचा अजब प्रकार उघडकीस आलेला आहे.

विद्यार्थ्यांचे नुकसान? - युवासेनेचे सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी सांगितले की, उषा मित्तल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयामध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनीची नुकतीच ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात आली होती. मात्र, डिप्लोमा उत्तीर्ण होऊन अभियांत्रिकीच्या पदवी अभ्यासक्रमासाठी थेट द्वितीय वर्षाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनींची महाविद्यालयाकडून 9 एप्रिलपासून ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहे. प्रथम वर्ष उत्तीर्ण होऊन द्वितीय वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थिनींची ऑनलाइन तर थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनींची ऑफलाइन पद्धतीने परीक्षा होत असल्याने या विद्यार्थिनीचे नुकसान होणार आहे.

विद्यार्थिनींची ऑनलाइन परीक्षा घ्या- ऑनलाईन परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत या विद्यार्थिनी कमी गुण मिळण्याची शक्यता आहे एकाच अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनी बाबत महाविद्यालयात दुजाभाव दाखवत असल्याने त्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे हे नुकसान टाळण्यासाठी थेट प्रवेशित विद्यार्थिनींची ऑनलाइन परीक्षा घेण्याचे निर्देश एसएनडीटी विद्यापीठाच्या उषा मित्तल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयाला देण्यात यावेत अशी मागणी युवा सेनेचे प्रदीप सावंत यांनी केली आहे.

चौकशीचे आदेश - परीक्षेतील या तफावतीमुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असल्याचे त्यांच्याकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे त्यामुळे विद्यार्थिनींच्या तक्रारीनंतर तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ यांना युवा सेनेच्या वतीने निवेदन दिले आहे. त्यांनी तातडीने सहसंचालक डॉ. प्रमोद नाईक यांना चौकशी करून महाविद्यालय खुलासा मागण्याचे आदेश दिलेला आहे, अशी माहितीसुद्धा प्रदीप सावंत यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.