ETV Bharat / city

Congress Protests Against Inflation : मोदी सरकारविरोधातील आंदोलनादरम्यान राज्यात काँग्रेसच्या लाखो कार्यकर्त्यांना अटक - नाना पटोले - Congress protest against inflation

मोदी सरकारची दडपशाही महागईच्या विरोधात आज काँग्रेसने देशभर आंदोलन ( Congress protests across country against inflation ) पुकारले. मुंबईतसुद्धा राजभवनला घेराव घालण्यासाठी काँग्रेसने आज आंदोलन केले. परंतू, पोलिसांनी काँग्रेसच्या नेत्यांना 149 ची नोटीस देत ताब्यात घेतले असून, आंदोलन करण्यापासून रोखले आहे. सरकारने कितीही प्रयत्न केले तरी, आमचा आवाज दडपला जाणार नाही असे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Congress state president Nana Patole ) यांनी म्हटले आहे.

Congress Protests  Against Inflation
नाना पटोले
author img

By

Published : Aug 5, 2022, 5:50 PM IST

मुंबई - वाढती महागाई, बेरोजगारी, मोदी सरकारची दडपशाहीच्या विरोधात आज काँग्रेसने देशभर आंदोलन ( Congress protests across country against inflation ) पुकारले. महाराष्ट्रासह, मुंबईत सुद्धा राजभवनला घेराव घालण्यासाठी काँग्रेसने आज आंदोलन केले. परंतू, पोलिसांनी काँग्रेसच्या नेत्यांना 149 ची नोटीस देत ताब्यात घेतले असून, आंदोलन करण्यापासून रोखले आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईचा काँग्रेसने तीव्र निषेध केला असून कितीही प्रयत्न केले तरी, आमचा आवाज दडपला जाणार नाही असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Congress state president Nana Patole ) यांनी सांगितले आहे. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मुंबईत १० हजार कार्यकर्त्यांना अटक - याप्रसंगी बोलताना नाना पटोले म्हणाले की, राहुल गांधी यांच्या नेृत्वाखालील आज आम्ही देशभर आंदोलन करत आहोत. मोदी सरकारने जीएसटी च्या माध्यमातून जी काही महागाई वाढलेली आहे, बेरोजगारी वाढलेली आहे, अग्निपथ योजना, शेतकऱ्यांचे प्रश्न या सर्व मुद्द्यांवर देशभर आज आम्ही आंदोलन करत आहोत. पण कालपासूनच आमच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना पकडण्यासाठी नोटीस बजावण्यात आल्या आहेत. एकट्या मुंबईत १० हजार पेक्षा जास्त व महाराष्ट्रात १ लाख पेक्षा जास्त काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी आज अटक केली आले आहे, असे नाना पटोले म्हणाले.

हेही वाचा - देव तारी त्याला कोण मारी; पुरलेले अर्भक काढले जिवंत, विहिरीत सापडली 2 दिवसांची मुलगी, तर मुलाला फेकले मात्र आई वाचली

आम्ही घाबरणार नाही, लढणार - पुढे नाना पटोले म्हणाले की, आज ज्या पद्धतीने काँग्रेस नेते राहुल गांधी व प्रियांका गांधी यांना फरफटत पोलिसांनी ताब्यात घेतले ते निंदनीय आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस पक्षाला व गांधी परिवाराला बदनाम करण्याचे काम मोदी सरकार करत आहे. लोकांच्या जखमेवर मीठ चोळण्याच काम मोदी सरकार करत आहे. पण आम्ही झुकणार नाही, दबणार नाही,घाबरणार नाही पण आम्ही ही लढाई अखेर पर्यंत लढत राहणार, असेही नाना पटोले म्हणाले.

हेही वाचा - Deepak Kesarkar : सुशांतसिंह प्रकरणी आदित्य ठाकरेंच्या बदनामीचा राणेंकडून डाव; दीपक केसरकरांचा हल्लाबोल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.