मुंबई काँग्रेसच्या राज्य कार्यकारिणीची बैठक नुकतीच मुंबईत पार पडली. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहामध्ये प्रदेश काँग्रेस समितीची विस्तारित कार्यकारिणीची बैठक झाली. यामध्ये मविआ सरकार पडले ते बरे झाले अडीच वर्षे मंत्री फक्त पैसेच खात होते. कार्यकर्त्याला नेते ढुंकून देखील पाहत नव्हते. त्यामुळे, हे सरकार गेलं त्याच्यामध्ये दुःख काय करायचं असं वक्तव्य एका पदाधिकाऱ्याने केल्याची माहिती समजते. यामुळे, स्वपक्षातील सदस्यांकडूनच काँग्रेसला घरचा आहेर मिळाला आहे.
प्रदेश काँग्रेस समितीची बैठक नुकतीच मुंबईमध्ये पार पडली . या बैठकीमध्ये प्रदेशाच्या एकूण पक्षाच्या कारभाराविषयी चर्चा निघाली. त्या चर्चेच्या दरम्यान समितीतील एका पदाधिकाऱ्याने, महाराष्ट्र विकास आघाडी सरकार जे पडले ते एक प्रकारे बरं झालं. पक्षाचे सगळेच मंत्री अडीच वर्षे पैसे खात होते . कार्यकर्त्याला ते ढुंकून देखील पहात नव्हते. त्यामुळे हे सरकार गेलं त्याच्यामध्ये दुःख काय करायचं, अशी जळजळीत भावना या बैठकीत बोलून दाखवल्याचे सूत्रांकडून समजले.
स्वपक्षातील सदस्यांकडून घरचा आहेर तर खदखद झाल्या नंतर ,' कार्यकर्त्यांची समाधान झाले असल्याचा दावा' काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केला. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहामध्ये महाराष्ट्राच्या प्रदेश काँग्रेस समितीचे विस्तारित कार्यकारिणीची बैठक नुकतीच झाली. यामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले तसेच देश स्तरावरील काँग्रेस समितीचे चिटणीस आशिष दुवा, सोनल पटेल यासह ठाकरे सरकार मधील काही माजी मंत्री,काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील हजर होते. त्यांच्या बैठकीतच ही घटना घडली त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले.
विधान परिषदेतील राजकारणाची पार्श्वभूमी या बैठकीत नवी मुंबईचे माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांनी या प्रदेश काँग्रेस कार्यकारणी समितीच्या बैठकीमध्ये आपली खदखद नेत्यांसमोर व्यक्त केली . या नाराजीला मागील विधानपरिषद निवडणूक त्याची पार्श्वभूमी आहे . नुकत्याच झालेल्या राज्य विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराकडून प्रतिपक्षाला मतदान झाले. त्याची देखील खदखद सदस्यांच्या मनात होती. त्या संदर्भात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन प्रकाश यांचा अहवाल काँग्रेस श्रेष्ठींकडे सुपूर्द केला आहे .मात्र त्या अहवालाच्या शिफारशींवर अद्यापही कार्यवाही नाही. त्यामुळे सदस्यांच्या मनात असंतोष साचला होता. हा संतोष प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीत उफाळून आला.
केंद्रीय नेत्यांसमोरच स्वपक्षाच्या मंत्र्यांवर तोफ डागली अडीच वर्षे आमचे मंत्री फक्त पैसे खाण्याचे काम करीत होते असं व्यक्त व केल्यानंतर त्यांना इतर सदस्यांनी पाठिंबा देत त्यांचे समर्थन केले. तसेच काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय नेत्याच्या समोर ही बाब प्रकर्षाने समोर आली. परिणामी उपस्थित सर्वच महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमधील माजी मंत्री आवाक झाले.
बाळासाहेब थोरात यांचा खुलासा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या कार्यकारिणीच्या बैठकीत सदस्यांनी ही आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली . त्या बाबतीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की. ' तीन पक्षाचे सरकार होते. प्रत्येक वेळेला सर्वांचीच कामे होतात असे नाही. त्यामुळे त्यांची नाराजी असू शकते. त्यांनी नाराजी या बैठकीत मांडली.