मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक ( Congress leaders oppose attack on Sharad Pawar house ) या निवासस्थानी काही लोकांनी हल्ला केला, चपला फेकल्या व शरद पवार यांच्या नावाने अश्लाघ्य भाषेत घोषणा दिल्या. हा प्रकार अत्यंत निषेधार्ह आहे. या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करून आंदोलकांना चिथवाणी देणारे कोण आहेत? त्याचा शोध घेऊन कडक कारवाई करा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. तर, लोकशाहीमध्ये अशा घटनांचे समर्थन होऊ शकत नाही, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.
हेही वाचा - MHADA Stamp Duty : म्हाडा इमारतींचा पुनर्विकासासाठी मुद्रांक शुल्काबाबतचे धोरण निश्चित करा- मुख्यमंत्री
यासंदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, ही काँग्रेस पक्षाची भूमिका राहिली आहे. सरकारनेही त्यांच्या मागण्या मान्य केल्या. काल न्यायालयानेही एसटी संपावर निर्णय दिला. तो निर्णयही सर्वांना मान्य आहे. परंतु, काल अचानक एक मोठा जमाव शरद पवार ( Sharad Pawar house ) यांच्या घरावर चाल करून जातो. हा नियोजनबद्धरितीने केलेला हल्ला दिसत आहे. या आंदोलकांना कोणीतरी शिकवून पाठवलेले असावे. या आंदोलकांना भडकावणारा कोण आहे? या प्रकारामागे जो कोणी असेल त्याचा शोध घेऊन कडक कारवाई करावी.
बाळासाहेब थोरात यांच्याकडूनही निषेध : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी काही लोकांनी केलेला भ्याड हल्ला निंदनीय आहे. लोकशाहीमध्ये अशा घटनांचे समर्थन होऊ शकत नाही. सामान्य एसटी कर्मचारी बांधवांची माथी भडकवून अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न जो कोणी करत असेल त्याच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे, असे ट्विट बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
हेही वाचा - Silver Oak Attack : सिल्व्हर ओक हल्लाप्रकरणी चौकशी होऊन कडक कारवाई : मंत्री आदित्य ठाकरे