ETV Bharat / city

Tipu Sultan Sports Complex controversy : टिपू सुलतान नावावरून भाजपची दुटप्पी भूमिका, सचिन सावंत यांची टीका

मालाडच्या क्रीडा संकुलाला टिपू सुलतानाचे ( Tipu Sultan Sports Complex ) नाव देण्याच्या मुद्द्यावरुन आक्रमक झालेल्या भाजपा नेत्यांना गुरुवारी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant slams BJP For Oppose Tipu Sultan) यांनी प्रत्युत्तर दिले.

सचिन सावंत
Sachin Sawant
author img

By

Published : Jan 27, 2022, 12:13 PM IST

मुंबई - मालाड येथील एका उद्यानाला टिपू सुलतान ( Tipu Sultan Sports Complex ) यांचे नाव द्यायचं ठरल आहे. यावरून आता महाराष्ट्र सरकार व भाजपा यांच्यात खडाजंगी रंगली आहे. मुंबई उपनगरातील मालाड येथील क्रीडांगणाला टिपू सुलतान यांचे नाव देण्यावरून राजकारण तापलेले असताना आता काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी (Sachin Sawant slams BJP For Oppose Tipu Sultan) भाजपावर निशाणा साधला आहे. 2013 मध्ये मुंबईच्या एम/पूर्व वॉर्डातील रस्त्याला शहीद टिपू सुलतान नाव देण्याच्या भाजपा नगरसेवकाच्या प्रस्तावाच्या समर्थनासाठी दुथडी भरून भाजपाचे नगरसेवक उपस्थित होते, असं ट्विट करत त्याबाबत भाजपा आता दुटप्पी भूमिका निभावत आहे, असे सांगितले आहे.

  • २. भाजपा नेते व कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा शहीद टिपू सुलतानच्या कबरीवर गेले तेव्हा तेथील अभ्यागत वही मध्ये जे टिपू सुलतान बद्दल मत मांडले आहे ते खाली देत आहे. आताची बदललेली संधीसाधू भूमिका ही सत्तेसाठी @BJP4Maharashtra च्या निर्लज्जतेचा कळस निश्चितच म्हणता येईल pic.twitter.com/EBAW4eSZkZ

    — Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) January 27, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
मुंबईच्या एम/पूर्व वॉर्डातील रस्त्याला शहीद टिपू सुलतान मार्ग नाव देण्याच्या भाजपा नगरसेवकाच्या प्रस्तावाच्या समर्थनासाठी दुथडी भरून भाजपाचे नगरसेवक उपस्थित होते. भाजपासाठी 2013 चे टिपू वेगळे, 2022 ला वेगळे! फरक हाच की तेव्हा निवडणूक नव्हती आणि आता आहे. या दुटप्पीपणाला काय म्हणावे?, असा सवाल सावंत यांनी केला. भाजपा नेते व कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा शहीद टिपू सुलतानच्या कबरीवर गेले. तेव्हा तेथील अभ्यागत वहीमध्ये जे टिपू सुलतान बद्दल मत मांडले होते. आताची बदललेली संधीसाधू भूमिका ही सत्तेसाठी असून हा भाजपाच्या निर्लज्जतेचा कळस निश्चितच म्हणता येईल, अशी टीका सचिन सावंत यांनी केली.
भाजपाची सोयीची दुटप्पी भूमिका -
सचिन सावंत यांनी या ट्विट सहित दोन्ही घटनांचे पुरावे देखील दिले आहेत. भाजपा नेते व कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा शहीद टिपू सुलतानच्या कबरीवर गेले होते. तेव्हा तेथील अभ्यागत वहीमध्ये टिपू सुलतान हे शूर होते व ब्रिटिश विरोधात ते प्राणपणाने लढले, असे येडीयुरप्पा यांनी लिहिले आहे. त्याचमुळे मुंबई महानगरपालिका निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन, असे सोयीचे राजकारण भाजपा करत असल्याचा आरोपही सचिन सावंत यांनी केला आहे. 2013 मध्ये टिपू सुलतान यांच्या नावासाठी आग्रह धरायचा व आता सत्ता हातातून गेल्यानंतर पुन्हा निवडणुकीसाठी टिपू सुलतान यांच्या नावाला विरोध करायचा, अशी दुटप्पी भूमिका भाजपा करत असल्याचं सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - Anil Avchat Passed Away : ज्येष्ठ साहित्यिक अनिल अवचट यांचे निधन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.