ETV Bharat / city

भाजपचाच नव्हे, तर बेरोजगारीच्या पापात शिवसेनेचाही वाटा - सचिन सावंत - सचिन सावंत

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी बेरोजगारीच्या पापात भाजपसह शिवसेना पक्षही तितकाच जबाबदार असल्याची टीका केली आहे. जनता त्यांच्या पापाचा वाटा लवकरच त्यांच्या ताटात टाकेल असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

सचिन सावंत
author img

By

Published : Jun 3, 2019, 5:56 PM IST

मुंबई - राज्यात निर्माण झालेले बेरोजगारीचे पाप हे केवळ भाजपचेच नाही, तर त्यांच्यासोबत मांडीला मांडी लावून सत्तेत बसलेल्या शिवसेनेचेही आहे. त्यांनी सत्तेसाठी राज्यातील जनतेचा विश्वासघात केल्याची टीका काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आज केली.

सचिन सावंत

शिवसेनेने मागील चार वर्ष सत्तेत बसून लोकांना मूर्ख बनवले. त्यांचा विश्वासघात केला. देशात प्रत्येक गोष्ट भाजप करत होता. त्यात नोटाबंदी असो, वा अत्याचार, जनतेला अडचणीत आणणारे विषय असतील, त्या सर्वामध्ये शिवसेना तितकीच सहभागी आहे. त्यामुळे भाजपने केलेल्या पापात शिवसेना ही तितकीच सहभागी आहे. त्यांच्या पापाचे माप जनता त्यांच्या पदरात लवकरच टाकेल, अशी टीकाही सावंत यांनी केली.

पुणे जिल्ह्यात हिंदुत्ववादी संघटनांकडून वाटण्यात आलेल्या शस्त्रांच्या संदर्भात सावंत यांनी टीका केली. भाजप, संघ हे आता राष्ट्रवादाच्या नावाखाली धर्मांधतेच्या, द्वेषाच्या अफूच्या गोळ्या तरुणांना देत आहेत. मूलभूत प्रश्नापासून त्यांचे दुर्लक्ष केले जात आहे. संघ विचार हे शस्त्राशी आणि द्वेषाशी जोडलेले असल्याने ते दसरा मेळाव्यात खुलेपणाने शस्त्रांची पूजा करतात. आता तर त्यांची सत्ता आल्यानंतर त्यांना अधिक उत आला. त्यामुळेच ते खुलेपणाने शस्त्र वाटण्याचे काम सुरू केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आता त्यांना राजमान्यता मिळत असल्याने आणि दुसरीकडे पोलिसांवर मोठ्या प्रमाणात दबाव असल्याने ते कितपत कारवाई करतील याबद्दल आमच्या मनात शंका असल्याचेही सावंत यांनी सांगितले.
आज राज्यात आणि देशात आरोग्य शैक्षणिक सुविधांचा पूर्ण बोजवारा उडालेला आहे. त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. महाराष्ट्र अधोगतीला जात असताना जे उद्योग येत नाही, ते दाखवले जात आहेत. मुख्यमंत्री ज्या विधानसभा क्षेत्रात येतात, त्या नागपूरमध्ये आरोग्य सुविधांची वाभाडे निघाले आहेत. त्यांच्या शहरातही ते आरोग्य सुविधा पुरवू शकले नाहीत, यापेक्षा दुर्दैव दुसरे कोणते नसल्याची टीकाही त्यांनी केली.

Intro:बेरोजगारीचे पाप केवळ भाजपाचेच नव्हे तर सेनेचेही- सचिन सावंत

Body:बेरोजगारीचे पाप केवळ भाजपाचेच नव्हे तर सेनेचेही- सचिन सावंत

मुंबई, ता. 3 :

राज्यात आणि देशात झालेले निर्माण झालेल्या बेरोजगारीचे पाप हे केवळ भाजपाचेच नाही तर त्यांच्यासोबत मांडीला मांडी लावून सत्तेत बसलेल्या शिवसेनेचेही आहे. त्यांनी सत्तेसाठी राज्यातील जनतेचा विश्वासघात केला असल्याची जोरदार टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आज केली.

शिवसेनेने मागील चार वर्ष सत्तेत बसून लोकांना मूर्ख बनवले. त्यांचा विश्वासघात केला. देशात प्रत्येक गोष्ट भाजप करत होता त्यात नोटबंदी असो वा अत्याचार, जनतेला अडचणीत आणणारे विषय असतील त्या सर्वामध्ये शिवसेना तितकीच सहभागी आहे. त्यामुळे भाजपने केलेल्या पापात शिवसेना ही तितकीच सहभागी असून त्यांच्या पापाचे माप जनता त्यांच्या पदरात लवकरच टाकेल अशी टीकाही सावंत यांनी केली.

पुणे जिल्ह्यात हिंदुत्ववादी संघटनांकडून वाटण्यात आलेल्या शस्त्रांच्या संदर्भात सावंत म्हणाले की, भाजपा, संघ हे आता राष्ट्रवादीच्या नावाखाली धर्मांधतेच्या, द्वेषाच्या अफूच्या गोळा तरुणांना ते देताहेत. मूलभूत प्रश्नापासून त्यांचे दुर्लक्ष केले जात आहे. संघ विचार हे शस्त्राशी आणि द्वेषाशी जोडली गेलेली असल्याने ते दसरा मेळाव्यात खुलेपणाने शस्त्रांची पूजा करतात. आता तर त्यांची सत्ता आल्यानंतर त्यांना अधिक उत आल्याने ते खुलेपणाने शस्त्र वाटणे यांचे काम सुरू केले आहे. आता राजमान्यता त्यांना मिळत असल्याने आणि दुसरीकडे पोलिसांवर मोठ्या प्रमाणात दबाव असल्याने ते कितपत कारवाई करतील याबद्दल आमच्या मनात शंका असल्याचेही सावंत यांनी सांगितले.

आज राज्यात आणि देशात आरोग्य शैक्षणिक सुविधांच्या पूर्ण बोजवारा उडालेला असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे महाराष्ट्र त अधोगतीला जात असताना जे उद्योग येत नाही ते दाखवले जात आहेत. मुख्यमंत्री ज्या विधानसभा क्षेत्रात येतात त्या नागपूरमध्ये आरोग्य सुविधांची वाभाडे निघाले असून त्या शहरातही ते आरोग्य सुविधा पुरवू शकले नाहीत यापेक्षा दुर्दैव दुसरे कोणते नसल्याची टीकाही त्यांनी केली.

Conclusion:बेरोजगारीचे पाप केवळ भाजपाचेच नव्हे तर सेनेचेही- सचिन सावंत
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.