ETV Bharat / city

'मनोरा पुनर्बांधणीचा निर्णय फडणवीस सरकारचाच, माहिती न घेता भाजपची भ्रष्टाचाराची बोंब'

मनोरा पुनर्बांधणीच्या कामावरून भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भाजप आमदार अतुल भातखळकर यांना काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. हे काम फडणवीस सरकारच्याच काळात देण्यात आल्याचे सांगत सचिन सावंत यांनी भातखळकर यांच्यावर पलटवार केला आहे.

मनोरा पुनर्बांधणीचा निर्णय फडणवीस सरकारचाच

author img

By

Published : May 9, 2021, 11:45 AM IST

Updated : May 9, 2021, 12:03 PM IST

मुंबई : मनोराच्या पुनर्बांधणीच्या निर्णयावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप बघायला मिळत आहेत. या पुनर्बांधणीच्या कामावरून भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भाजप आमदार अतुल भातखळकर यांना काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. हे काम फडणवीस सरकारच्याच काळात देण्यात आल्याचे सांगत सचिन सावंत यांनी भातखळकर यांच्यावर पलटवार केला आहे.

सचिन सावंत यांचे ट्विट
सचिन सावंत यांचे ट्विट

सोशल मीडियावर पोस्ट टाकून सावंत यांचे उत्तर

सचिन सावंत यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून भातखळकर यांच्यावर पलटवार केला आहे. 'मनोरा आमदार निवास पुनर्बांधणीचा निर्णय फडणवीस सरकारचाच होता. सत्ता हव्यासापोटी मविआ सरकारला भाजप बदनाम करतंय. फडणवीस सरकारने मोदी सरकारच्या NBCC ला काम दिले. NBCC ने प्रकल्पाची किंमत ९०० कोटी केली. यात माहिती न घेता भ्रष्टाचार झाल्याची बोंब भाजप आमदार अतुल भातखळकर ठोकत आहे' अशी पोस्ट सावंत यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यामुळे आता या मुद्द्यावरून भाजप-काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप बघायला मिळत आहेत.

ट्विटसोबत सावंत यांनी जोडलेले फोटो
ट्विटसोबत सावंत यांनी जोडलेले फोटो

फडणवीस सरकारनेच दिले काम

मनोरा आमदार निवास प्रकल्पाच्या पुनर्बांधणीत तीनशे कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला होता. मात्र हे काम फडणवीस सरकारने केंद्र सरकारच्या एनबीसीसी या कंपनीला ई टेंडरिंगद्वारे दिलं होतं. याच कंपनीने या प्रकल्पाच्या पुनर्बांधणीची किंमत अंदाज पत्रकात 875 कोटी इतकी असल्याचे सांगितले होती. मग भारतीय जनता पक्षाकडून या प्रकल्पात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप कशाच्या आधारावर केला जातोय, असा सवाल काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात या प्रकल्पाचं काम एनबीसीसी या कंपनीला दिल्याचे दस्तावेज देखील सचिन सावंत यांच्याकडून समोर आणण्यात आले आहेत.

ट्विटसोबत सावंत यांनी जोडलेले फोटो
ट्विटसोबत सावंत यांनी जोडलेले फोटो
भाजपने तत्काळ माफी मागावी

ठेकेदारांची तांत्रिक पूर्व अर्हता निविदा सुरू आहे. ठेकेदारांची पात्रता प्रकल्प किंमतीपेक्षा अधिकची असते. मोदी सरकारच्या एनबीसीसीने भ्रष्टाचार केला का? फडणवीसांनी भ्रष्टाचारी कंपनीची नियुक्ती केली का? भाजपने उत्तर द्यावे व खोटे आरोप केल्याबद्दल तात्काळ माफी मागावी अशी मागणी सचिन सावंत यांनी केली आहे. भारतीय जनता पक्षाकडून केवळ महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी असे आरोप केले जात आहेत असं देखील सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.

ट्विटसोबत सावंत यांनी जोडलेले फोटो
ट्विटसोबत सावंत यांनी जोडलेले फोटो
अतुल भातखळकरांचे आरोप

भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांनी मनोरा आमदार निवास पुनर्बांधणीच्या प्रकल्पावरून महाविकास आघाडी सरकारवर आरोप केले होते. प्रकल्प सहाशे कोटींचा असताना यासाठी आता महाविकास आघाडी सरकार 900 कोटी रुपये देणार आहे. त्यामुळे या प्रकल्पात तीनशे कोटींचा भ्रष्टाचार महाविकास आघाडी सरकारकडून केला जातोय असा आरोप अतुल भातखळकर यांनी केला होता. पण अतुल भातखळकर यांनी या प्रकल्पासंबंधी कोणतीही माहिती न घेता महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याच्या उद्देशाने आरोप केले आहेत. अतुल भातखळकर यांनी या प्रकल्पासंबंधी कोणतीही माहिती घेतली नाही असा टोलाही सचिन सावंत यांनी आपल्या ट्विटमधून लगावला आहे.

Last Updated : May 9, 2021, 12:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.