ETV Bharat / city

शाहरुख खानच्या मुलाच्या अटकेला हिंदु-मुस्लीम रंग देण्याचा प्रयत्न - पटोले - nana patole+ncb

झोपी गेलेल्या मोदी सरकारला जागे करण्यासाठी १४ ते २९ नोव्हेंबरदरम्यान जनजागरण अभियानाच्या माध्यमातून राज्यभर आंदोलन केले जाणार असून यावेळी ‘जेलभरो’ आंदोलनही केले जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

nana patole
nana patole
author img

By

Published : Oct 21, 2021, 6:52 PM IST

मुंबई - केंद्रातील भारतीय जनता पार्टीच्या सरकारने अर्थव्यवस्था रसातळाला नेऊन ठेवली असून मंदीमुळे लाखो लोकांचा रोजगार गेला आहे. महागाईमुळे सर्वसामान्य लोकांना दिवाळीसुद्धा करणे मुश्कील झाले आहे. काँग्रेसने या महागाईविरोधात वारंवार आंदोलने केली, पण मोदी सरकारला जाग आलेली नाही. आता पुन्हा एकदा झोपी गेलेल्या मोदी सरकारला जागे करण्यासाठी १४ ते २९ नोव्हेंबरदरम्यान जनजागरण अभियानाच्या माध्यमातून राज्यभर आंदोलन केले जाणार असून यावेळी ‘जेलभरो’ आंदोलनही केले जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

हेही वाचा - राज्य सरकारने केलेल्या कामावर टीका करण्याचा भाजप नेत्यांना जॉब - नाना पटोले

'भाजपाविषयी जनतेत प्रचंड रोष'

टिळक भवन येथे काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले, की या बैठकीत संघटना मजबूत करण्यावर चर्चा करण्यात आली. काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात मानणारा मोठा वर्ग आहे. देशात व राज्यात भाजपाने चालवलेल्या कारभारावर जनतेमध्ये प्रचंड संताप व चीड आहे. जाती धर्मांत फूट पाडून भाजपा आपली राजकीय पोळी भाजत आहे. काँग्रेस सर्व समाज घटकाला बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे. राज्यात पुन्हा एकदा काँग्रेसला मोठा जनाधार मिळत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये चौथ्या क्रमांकावरून पुन्हा एकदा पहिल्या नंबरवर आला आहे. या कामगिरीत सातत्य ठेवून पक्षाला गतवैभव प्राप्त करून देणे व सोनिया व राहुल गांधी यांचे हात बळकट करण्यासाठी सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी जिल्ह्याजिल्ह्यात पक्ष संघटन बळकट करण्यासाठी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

हेही वाचा - भाजपा हे शेतकरी विरोधी, हा देश कृषीप्रधान देश आहे भाजपा विचाराचा नाही - नाना पटोले

'दाल मे कुछ काला है'

एनसीबीच्या कारवायांबद्दल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पटोले म्हणाले, की कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही. ते चुकीचे करतील त्यावर कारवाई झाली पाहिजे. पण अदानी मुंद्रा बंदरावर ३००० हजार किलो अंमली पदार्थ सापडले त्याचे काय झाले? त्याच्यावर काहीच कारवाई केली जात नाही. आपल्या उद्योगपती मित्रांना वाचवण्यासाठी व अदानी मुंद्रा बंदरावर सापडलेल्या अंमली पदार्थांच्या मोठ्या साठ्यावरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी मुंबईत कारवाया केल्याचे दाखवले जात आहे. मुंबईतील एनसीबीच्या कारवाया म्हणजे ‘दाल मे कुछ काला है’ असे वाटते. शाहरुख खानच्या मुलाला एनसीबीने अटक केली. त्याला हिंदु-मुस्लीम रंग देण्याचा अत्यंत हिन प्रयत्न भाजपाकडून होत असल्याचेही पटोले म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.