ETV Bharat / city

Nana Patole : मोदी सरकारचे अपयश लपवण्यासाठी भाजपची ‘बुस्टर सभा’; नाना पटोलेंची टीका

महागाई, बेरोजगारी, अर्थव्यवस्था, शेतकरी, कामगार यांच्या प्रश्नावर मोदी सरकारकडे सांगण्यासारखे काहीही नाही. हे अपयश लपवण्यासाठी बुस्टर सभा ( Booster Sabha ) घ्यावा लागत असल्याची टीका नाना पटोलेंनी भाजपवर केली ( Nana Patole Criticizes Bjp ) आहे.

Nana Patole
Nana Patole
author img

By

Published : May 1, 2022, 4:13 PM IST

Updated : May 1, 2022, 5:52 PM IST

मुंबई - महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराज, शाहु, फुले, आंबेडकरांच्या विचाराने वाटचाल करणारे राज्य आहे. हा पुरोगामी विचारच राज्याला प्रगतीपथावर घेऊन गेला. तोच विचार राज्याच्या हिताचा आहे. परंतु, मागील काही वर्षांपासून महाराष्ट्रात जात्यांध्य व धार्मिक विचाराला पुढे करून राज्यात अशांतता निर्माण करण्याचे काम केले जात आहे. हा जात्यांध विचार थांबवण्याची गरज आहे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले ( Congress Leader Nana Patole ) यांनी केले आहे. प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

पुरोगामी विचाराला छेद देण्याचे काम?- नाना पटोले पुढे म्हणाले की, राज्यात पुरोगामी विचार रुजलेला आहे. त्याला छेद देण्याचे काम काही लोक करत आहे. हा विचार राज्याच्या प्रगतीसाठी घातक आहे. केंद्रातील भाजप सरकारने कामगार हिताच्या कायद्यामध्ये मोठे बदल करुन त्यांना देशोधडीला लावण्याचे काम केले आहे. मुठभर भांडवलदारांच्या दावणीला बांधून कामगारांचे हक्क व अधिकार हिरावण्याचे काम केले आहे. पण, कामगारांचे हक्क व अधिकार अबाधित ठेवण्यासाठी आपण काम करू, असे आश्वासन पटोलेंनी यावेळी दिले आहे.

नाना पटोले महाराष्ट्र दिनानिमित्त संवाद साधताना

अपयश लपवण्यासाठी भाजपची बुस्टर सभा - केंद्रातील भाजप सरकार सर्व आघाड्यांवर सपशेल फेल झालेले आहे. महागाई, बेरोजगारी, अर्थव्यवस्था, शेतकरी, कामगार यांच्या प्रश्नावर मोदी सरकारकडे सांगण्यासारखे काहीही नाही. मोदी सरकारचे हे अपयश लपवण्यासाठी भाजपला 'बुस्टर सभा' ( Booster Sabha ) घ्याव्या लागत आहेत. मात्र, जनतेवर त्याचा काहीही परिणाम होणार नाही, अशी टीका नाना पटोलेंनी भाजपवर केली ( Nana Patole Criticizes Bjp ) आहे.

हेही वाचा -आम्ही पंतप्रधान मोदी यांच्या घरासमोर कुराण वाचले तर चालेल का?, खासदार ओवेसींची राणा दाम्पत्यावर टिका

Last Updated : May 1, 2022, 5:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.