मुंबई - महाविकास आघाडीचा आज मंत्रिमंडळ विस्तार झाला. या विस्तारात माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे सुपुत्र आणि लातूरचे आमदार अमित देशमुख यांनी देखील कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. यावेळी अमितदेशमुख विलासरावांच्या आठवणीने गहिवरलेले पाहायला मिळाले.
देशमुख म्हणाले, मी सोनिया गांधीचा आभारी आहे. मी राहुल गांधींचा आभारी आहे. मल्लिकार्जुन खरगे यांचाही आभारी आहे. मी पक्षातील सर्वांचा आभारी आहे. आज मंत्रीपदाची शपथ घेताना मला विलासराव देशमुख यांची प्रकर्षाने आठवण येते त्यांच्या स्मृतीला अर्पण करूनच मी माझ्या मंत्रीपदाचे काम करणार आहे.
तसेच लातुरच्या मतदारांनी मला तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून दिले आहे. आघाडी सरकारचा समान किमान कार्यक्रम राबवण्यासाठी मी मंत्री म्हणून कटिबद्ध राहील. मंत्रिमंडळामध्ये अनेक अनुभवी आणि तरुण अशा मंत्र्यांचे कॉम्बिनेशन आहे. त्यामुळे काम करणं निश्चितपणे सोपं जाईल. देशभरामध्ये येणार सीएए आणि एनआरसी मधून तरुणही अस्वस्थ आहे. महा विकास आघाडीच्या मंत्रिमंडळाने यापूर्वीच या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली असल्याचेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्री अजित पवार निश्चितपणे यापुढील काळातही तर नाही आणि देशातल्या अशांत जनतेला साथ देतील, असा मला विश्वास आहे. माझे वडील विलासराव देशमुख हे मला सदैव स्मरणात आहेत. त्यांना साक्ष ठेवूनच मी राज्याचा कारभार या पुढील काळातही प्रामाणिकपणे करेण असा विश्वासही अमित देशमुखांनी याेवळी व्यक्त केला आहे.