ETV Bharat / city

संजय निरुपम यांच्यावर हायकमांड करणार कारवाई?

काही वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशमध्ये बसपसोबत युती करून काँग्रेसने मोठी चूक केली होती. त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस इतक्या खाली गेली आहे, की आजपर्यंत ते पुढे नाही आले. शिवसेनेसोबत जाणे म्हणजे स्वतः गाडून घेण्यासारखे आहे, असे ट्विट संजय निरुपम यांनी केले होते .

संजय निरुपम
author img

By

Published : Nov 21, 2019, 10:34 PM IST

Updated : Nov 22, 2019, 4:36 PM IST

मुंबई - राज्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेसह काँग्रेसची नवी महाविकासआघाडी उदयाला येत असताना सातत्याने काँग्रेस नेते व माजी मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी हायकमांडच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. निरुपम यांच्या भूमिकेवर पक्षातील काही नेते नाराज असून त्यांच्याविरोधात हायकमांडला पत्र लिहले असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसात निरुपम यांच्यावर कारवाई होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा - मुंबईतील दोन शास्त्रज्ञांची ऑनलाईन फसवणूक, लाखो रुपायांना घातला गंडा

काही वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशमध्ये बसपसोबत युती करून काँग्रेसने मोठी चूक केली होती. त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस इतक्या खाली गेली आहे, की आजपर्यंत ते पुढे नाही आले. शिवसेनेसोबत जाणे म्हणजे स्वतः गाढून घेण्यासारखे आहे, असे ट्विट संजय निरुपम यांनी केले होते . शिवसेनेच्या नेतृत्वातील सरकारमध्ये तिसऱ्या क्रमांकाचे स्थान मिळवणे हे महाराष्ट्रात काँग्रेस दफन करण्यासारखेच आहे. काँग्रेस अध्यक्षांनी कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी पडू नये, असा सल्लाही निरुपम यांनी हायकमांडला ट्विटद्वारे दिला आहे. यापूर्वीही निरुपम यांनी शिवसेनेसोबत आघाडी करण्याच्या मुद्यावर जाहीर विरोध दर्शवला होता निरुपम यांच्या ट्विटमुळे मुंबई काँग्रेसमधली गटबाजी उफाळून आली असून निरुपम यांच्याविरोधातला गट सक्रिय झाला आहे की निरुपम यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी. निरुपम विरोधातील गटाने हायकमांडला कारवाई संदर्भात पत्र दिले असल्याचे सांगितले जात आहे.

एकीकडे शिवसेनेच्या नेतृत्वात राष्ट्रवादी आणि काँग्रेसची महाविकासआघाडी दृष्टीपथात येत असताना निरुपम यांच्या ट्विटमुळे वेगळे वळण लागण्याची शक्यता असल्याचे काँग्रेसच्या एका गोटातून सांगितले जात आहे.

काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादी युतीच्या घडामोडींना बुधवारी दिल्लीत वेग आला होता. आता शुक्रवारी मुबंईत विविध बैठकांमध्ये नव्या महाविकासआघाडीचे अंतिम रूप स्पष्ट होणार आहे. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांची संयुक्त बैठक होऊन, युतीचा निर्णय जाहीर केल्यानंतर निरुपम यांच्यावर कारवाई होणार असल्याचेही काँग्रेसच्या गोटात बोलले जात आहे.

Intro:
संजय निरुपम यांच्यावर हायकमांड करणार कारवाई ?

राज्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेसह काँग्रेसची नवी महाविकास आघाडी उदयाला येत असताना सातत्याने काँग्रेस नेते माजी मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी हायकमांडच्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह लावले आहे . निरुपम यांच्या भूमिकेवर पक्षातील काही नेते नाराज असून त्यांच्या विरोधात हाय कमांडला पत्र लिहले असल्याची माहिती मिळत आहे . पुढच्या काही दिवसात निरुपम यांच्यावर कारवाई होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे .

काही वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशमध्ये बसप सोबत युती करून काँग्रेसने मोठी चूक केली होती. त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस इतक्या खाली गेले आहे, की आजपर्यंत ते पुढे नाही आले. शिवसेने सोबत जाणे म्हणजे स्वतः गाडून घेण्यासारखे आहे , असे ट्विट संजय निरुपम यांनी केले होते . शिवसेनेच्या नेतृत्वातील सरकारमध्ये तिसऱ्या क्रमांकाचे स्थान मिळवणे हे महाराष्ट्रात काँग्रेस दफन करण्यासारखेच आहे. काँग्रेस अध्यक्षांनी कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी पडू नये असा सल्ला हि निरुपम यांनी हायकमांडला ट्विट द्वारे दिला आहे . यापूर्वी ही निरुपम यांनी शिवसेनेसोबत आघाडी करण्याच्या मुद्यावर जाहीर विरोध दर्शवला होता . निरुपम यांच्या ट्विट मुळे मुंबई काँग्रेस मधली गटबाजी उफाळून आली असून निरुपम यांच्या विरोधातला गट सक्रिय झाला आहे की निरुपम यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी. निरुपम विरोधातील गटाने हायकमांडला कारवाई संदर्भात पत्र दिले असल्याचे सांगितले जात आहे .

एकीकडे शिवसेनेच्या नेतृत्वात राष्ट्रवादी आणि काँग्रेस ची महाविकास आघाडी दृष्टीपथात येत असताना निरुपम यांच्या ट्विट मुळे वेगळे वळण लागण्याची भीती असल्याचे मत देखील काँग्रेसच्या एका गोटात व्यक्त केले जात आहे .

काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादी युतीच्या घडामोडींना बुधवारी दिल्लीत वेग आला होता . वेग आला आहे. आता शुक्रवारी मुबंईत विविध बैठकांमध्ये नव्या महा विकास आघाडीचे अंतिम रूप स्पष्ट होणार आहे . शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांची संयुक्त बैठक होऊन, युतीचा निर्णय जाहीर केल्या नंतर निरुपम यांच्यावर कारवाई होणार असल्याचे ही काँग्रेसच्या गोटात बोलले जात आहे .

संजय निरुपम यांनी मागील काही काळात केलेले ट्विट जोडत आहेत
Body:जConclusion:ज
Last Updated : Nov 22, 2019, 4:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.