ETV Bharat / city

एसटीला शासनाचा 'विभाग' घोषित करा - महाराष्ट्र एसटी काँग्रेस; मागणीसाठी काढणार पदयात्रा

author img

By

Published : Jul 31, 2020, 11:01 AM IST

आर्थिक कचाट्यात सापडलेल्या एसटी महामंडळाला कारभार सांभाळणे कठीण झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने एसटी महामंडळाला राज्य शासनाचा विभाग म्हणून घोषित करावे, या मागणीसाठी महाराष्ट्र एसटी काँग्रेस कर्मचारी क्रांतिदिनी पदयात्रा काढणार आहे.

राज्य परिवहन महामंडळ
एसटीला शासनाचा 'विभाग' घोषित करा; आमदार भाई जगताप काढणार पदयात्रा

मुंबई - लॉकडाऊनमुळे आर्थिक कचाट्यात सापडलेल्या राज्य परिवहन (एसटी) महामंडळाला आपला कारभार सांभाळणे कठीण झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने एसटी महामंडळाला राज्य शासनाचा विभाग म्हणून घोषित करावे आणि शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटीच्या कर्मचाऱ्यांचा दर महिन्याच्या ठरलेल्या तारखेला वेळेवर वेतन द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र एसटी काँग्रेसच्या सदस्यांनी केली आहे. या मागणीसाठी हे कर्मचारी क्रांतिदिनी पदयात्रा काढणार आहे.

महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांच्यासह चार पदाधिकारी 9 ऑगस्ट या क्रांतिदिनी पदयात्रा काढणार आहेत. तसेच क्रांतिवीरांना अभिवादन करुन आगळ्या-वेगळ्या पद्धतीने आपल्या मागण्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडण्याचा त्यांनी संकल्प केला आहे.

ऐतिहासिक कामगार मैदान परळ येथून हुतात्मा बाबू गेनू यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन ऑगस्ट क्रांती मैदान, गवालिया टँकपर्यंत ही पदयात्रा जाणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन सोशल डिस्टन्सिंग ठेऊन फक्त पाच पदाधिकारी या पदयात्रेत सहभागी होतील. यात कामगार नेते आणि आमदार भाई जगताप हेसुद्धा सहभागी होणार आहेत.

मागील 100 दिवसांमध्ये एसटीचे तब्बल अडीच हजार कोटींचे उत्पन्न बुडाले आहे. सुमारे सहा हजार कोटी संचित तोटा असणाऱ्या एसटीला भविष्यात सक्षमपणे उभे राहण्यासाठी राज्य शासनाच्या आर्थिक मदतीची नितांत गरज आहे. अशा वेळी राज्य शासनाने एसटीचे स्वतंत्र आस्तित्व काढून घेऊन तिला राज्य शासनाचा एक विभाग म्हणून दर्जा द्यावा किंवा शासनात विलिनीकरण करावे आणि शासनाचा 'विभाग' म्हणून आवश्यक असणाऱ्या सर्व तरतुदी एसटीला लागू कराव्या, अशी मागणी या निवेदनाद्वारे बरगे यांनी मुख्यमंत्र्यांना करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.