ETV Bharat / city

मिठी नदीवरील नाल्यांचे निकृष्ट काम, बिले रोखण्याची काँग्रेसची मागणी - रवी राजा

मुंबईत 26 जुलै, 2005 रोजी रौद्ररूप धारण करणाऱ्या मिठी नदीवरील बापट नाला व सफेद पूल नाल्यामधील सांडपाण्याचा प्रवाह बोगद्याद्वारे धारावी मलजल प्रक्रिया केंद्रात वळवण्याचे काम सुरू आहे. हे काम समाधानकारक झालेले नाही, त्यामुळे हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे आढळल्यास त्याची बिले देण्यात येऊ नये, अशी मागणी काँग्रेसने महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

मुंबई महापालिका
मुंबई महापालिका
author img

By

Published : May 1, 2022, 7:53 PM IST

मुंबई - मुंबईत 26 जुलै, 2005 रोजी रौद्ररूप धारण करणाऱ्या मिठी नदीवरील बापट नाला व सफेद पूल नाल्यामधील सांडपाण्याचा प्रवाह बोगद्याद्वारे धारावी मलजल प्रक्रिया केंद्रात वळवण्याचे काम सुरू आहे. हे काम समाधानकारक झालेले नाही, त्यामुळे हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे आढळल्यास त्याची बिले देण्यात येऊ नये, अशी मागणी काँग्रेसने महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

निकृष्ट बांधकाम - मिठी नदीचे एकूण पाणलोट क्षेत्र सुमारे 7 हजार 295 हेक्‍टर आहे. पावसाळ्यात पवई विहार तलावाच्या अतिरिक्त पाणी मिठी नदीतून प्रवाहित होते. हे पाणी आजूबाजूच्या परिसरातील मलजल व औद्योगिक सांडपाणीही बाराही महिने मिठी नदीतून प्रवाहित होते. हे पाणी मिठी नदीवरील बापट नाला व सफेद पूल नाल्यामधील सांडपाण्याचा प्रवाह बोगद्याद्वारे धारावी मलजल प्रक्रिया केंद्रात वळवण्याच्या कामासाठी स्थायी समितीने 11 ऑगस्ट, 2019 रोजी मंजुरी दिली आहे. संबंधित काम समाधानकारक केले नसल्याच्या तक्रारी स्थानिक नागरीकांकडून केल्या जात आहेत. काँग्रेसने याची दखल घेऊन या तक्रारीसंबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनासव आणून दिले आहेत. अधिकारी आणि ठेकेदारांचे लागेबांधे असल्यामुळे नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याची शक्यता आहे. पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी व्यक्त केली आहे. पालिका प्रशासन आणि आयुक्त यांना पाठवलेल्या पत्रात त्याची तक्रार रवी राजा यांनी केली आहे.

बिले देऊ नका - कंत्राटदाराने मागील 5 वर्षात कोणकोणत्या ठिकाणी कामे केलेली आहेत. ती कामे समाधानकारक पूर्ण केली आहेत का.?, असा प्रश्न उपस्थित करत याबाबत दक्षता विभागाकडून चौकशी करावी, नदीच्या कामाची कामे निकृष्ट दर्जाची झाली असल्यास त्याची बिले कंत्राटदाराला दिली जाऊ नयेत, अशी मागणी रवी राजा यांनी केली आहे.

हेही वाचा - BMC Nalasfai Issue : आयुक्तांच्या आदेशानंतरही नालेसफाई संथ गतीने; केवळ 27 टक्केच काम पूर्ण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.