मुंबई शिंदे- फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर, त्यांचा पहिल्या दहीहंडीमध्ये जोरदार प्रचार आणि नियोजन अख्या महाराष्ट्राने पाहिलं. ठीकठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाच्या आमदारांच्या दहीहंडी अत्यंत जोरात आणि उत्साहाने साजरा झाल्या. त्यात लाखांचे बक्षीसही ठेवले गेले होते. आता गणेशोत्सवामध्ये गणपती मंडळांसाठी विविध स्पर्धांच्या आयोजन करून लाखोंचे बक्षीस ठेवलेली आहेत. त्याचबरोबर भाजपाचा प्रचार बेस्ट बसवर देखील केला Best bus Mumbai गेला. त्याविरोधात बेस्ट बसच्या प्रशासनाकडे नागरिकांनी तक्रार केली आहे. Congress and Shiv Sena criticize BJP
दहीहंडीच्या सणामध्ये जबरदस्त प्रचार भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी केला होता. शिंदे गट आणि भाजपाच्या आमदारांनी दहीहंडीवर लाखोंची बक्षीस ठेवली होती. तसेच गणेशोत्सवामध्ये पण मतदारांना आकर्षित करण्यासाठी आतापासूनच विविध गणपती मंडळांना स्पर्धेमध्ये सामावून घेऊन त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न शिंदे गट आणि भाजपा करत आहे. मात्र गणेशोत्सवामध्ये मुंबईभर 'आता आपले सरकार आले.... हिंदू सणांवरचे विघ्न टळले ...' अशा मथळ्याचे जाहिरातीचे फलक बेस्ट बसवर पाहायला promoting religion on Best bus मिळाले. श्याम पाखरे यांनी त्याविरोधात तक्रार केलेली आहे.maharashtra politics
राजकीय जाहिरातींमुळे समाजात जातीय द्वेष निर्मिती तक्रारदार यांनी ईटीवी भारत सोबत संवाद साधताना माहिती दिली की," मी रस्त्यावर भाजपाची ची राजकीय जाहिरात असलेली BEST बस Best bus public property पाहिली. धर्मनिरपेक्ष देशाचा नागरिक आणि बेस्टचा नियमित प्रवासी म्हणून मला ते फारच आक्षेपार्ह वाटले. त्यामुळे आपल्या समाजात जातीय द्वेष निर्माण होईल. माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की, तुम्ही ही जाहिरात तात्काळ काढून टाकावी. भविष्यात अशा जाहिराती बेस्ट बसेसवर दिसणार नाहीत, याची काळजी घ्या. नियमाचे पालन सर्वांनी करायला पाहिजे.
शिवसेनेचे नेते अजय चौधरी यांच्याशी ई टीव्ही भारत ने संवाद साधले असता ,त्यांनी या कृतीवर टीका केली आहे. त्यांनी याबद्दल भाजपला सल्ला दिला की, "कोणत्याही पक्षाने भारतीय राज्यघटनेचा आणि नियमांचे पालन करूनच सर्व बाबी करायला हव्यात. नियमाचे पालन आपणच करणार नाही, तर मग करायचं कोणी त्यामुळे याबद्दल सर्वांनी दक्ष राहिले पाहिजे."
काँग्रेसची देखील भाजपावर टीका - काँग्रेस प्रणित बेस्ट एम्प्लॉय युनियनचे मुंबई अध्यक्ष नितीन पाटील यांनी देखील बेस्ट ही सार्वजनिक मालमत्ता आहे. तिच्यावर अशा कुठल्या एका धर्माचा प्रचार करणे हे अनुचित आहे. नियमांचे पालन करायला पाहिजे. या संदर्भात बेस्ट प्रशासनाने दखल घेतली पाहिजे, अशी प्रतिक्रिया त्यांनी ईटीव्ही सोबत संवाद साधताना दिली आहे. Best bus public property dont promote any religion on it Congress and Shiv Sena criticize BJP